shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विजयकांत मुंडे यांच्या लढ्याला येणार यश रद्द झालेल्या रस्त्याचे प्रश्र्न लागणार मार्गी..!!

                    
========================                             
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                              
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केज व गेवराई मतदार संघातील मंजूर असलेले १०८ कोटी रूप रयांचे ३४ रस्ता कामे आघाडी सरकारने रद्द केल्याने विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल केली होती.त्यानंतर ११ जानेवारी २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिकेवर सुनावणी झाली या दरम्यान मा.उच्च न्यायालयाच्याने रद्द केलेल्या कामासंदर्भात तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.


परंतू सहा ते सात महिने राज्य सरकारने मा.उच्च न्यालयाच्या आदेशाला डावलून वेळकाढूपणा केल्याने मागील महिन्यात पुन्हा विडा गटाचे जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे पुणर्विचार याचिका दाखल केल्यानंतर राज्यसरकारला जाग आली आसून मा.सचिव (मु.मं.ग्रा.स.यो) ग्रामविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे ८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० वा बैठकीचे आयोजन केले आहे तरी जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी पत्राद्वारे कळवले आहे.त्यामुळे विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी दिलेल्या लढ्याला यश येणार आसून रद्द झालेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
close