शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

  राहुरी: तालुक्‍यातील काही ठिकाणी ढग फुटी सदृश पाऊस झाला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे.तालुक्यातील मल्हारवाडी, बारागाव नांदूरसह अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे.
    हावरीच्या ओढ्याला मोठा पूर आल्याने नांदूरचा राहुरीशी संपर्क तुटला आहे.टाकळीमिया परिसरात ६७ मी.मी पावसाची नोंद झाली असून ओढे-नाले फुल्ल होऊन शेतात पाणी शिरल्याने शेतकर्‍यांचे कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शेतकरी

 
हवालदिल झाला आहे.तसेच या ढग फुटी सदृश पावसाने चिंचविहीरे परिसरात ओढेनाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे
अतिृष्टीमुळे परिसरात जास्त पाण्याचे प्रवाहने शेतीसह गावात देखील पाणीच पाणी झाले आहे. गावात आलेल्या पाण्याच्या प्रवाहाना काही अडचण येऊ नये म्हणून गावचे सरपंच मंगेश गाडे ,उपसपंच प्रतिनिधी किशोर जाधव सर्व सदस्य सहकारी तसेच सुधिर गावडे, अमोल गाडे, रमेश गावडे, बाबासाहेब जाधव, रामभाऊ गाडे,संदीप गाडे, अमोल जाधव, शुभम सरोदे, अजित साबळे, दादा जाधव, विकास गावडे, दादा कोठुले, कौस्तुभ गोसावी, दादा सागर, प्रविण जाधव, गणेश येवले, भैय्या गाडे, सचिन गाडे, भोरू डोंगरे, संतोष पवार यांच्यासह गावातील युवक मदत कार्य करत आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600