shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात ..आता जळगाव जागृत जनमंच...

जळगांव:-जळगाव जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लागलेली आहे.त्यातील संचालक पदाची निवडणूक न लढवता बिनविरोध व्हावी असे जिल्ह्यातील सेना,भाजप,कांग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, एकनाथ खडसे,संदिप पाटील यांनी गळाभेट घेतली. आपण आणि  आपल्या कुटुंबातील सदस्यांनी  उमेदवारी करायची. बिनविरोध संचालक मंडळ बनवायचे.जेडीसीसी संचालक मंडळ घरातच चालवायचे.जेडीसीसी ची तिजोरी खिशात घालायची.असा हा कार्यक्रम मागील सात दिवसापासून राबवला जात आहे.दिवसा विरोधक आणि रात्री सहोदर असा नौटंकी खेळ चालू आहे.हे पाहून जिल्ह्यातील लोकांनी निराशेचा,तिरस्काराचा सूर काढला.म्हणे पुन्हा, पुन्हा तेच संचालक, चेयरमन. मग,आम्ही काय करायचे? लोकांना असा प्रश्न पडला. त्याचे उत्तर आम्ही शोधले.वंचितांनी दंड ठोकून बंड करायचे. उमेदवारी करायची.निवडणूक लढायची.स्वताला अजमावून घ्यायचे.
   यासाठी आज जळगाव मधील महाबळ स्थित सैनिक कल्याण हॉलमधे जिल्ह्यातील ईच्छुक उमेदवारांनी  बैठकीला उपस्थिती दिली.पारोळा, धरणगाव, एरंडोल जळगाव ,रावेर तालुक्यातील उमेदवार आणि मतदार स्वेच्छेने आले.जाणेयेणे खाणेपिणे यासाठी कोणाचेही लांगुनचागुन न करता,तशी अपेक्षा न ठेवता लोक आलेत.त्यांनी चर्चेत भाग घेतला. आम्हाला सुचना दिल्यात.कोणी अनुभवाचे बोल सांगितले. आणि तयारी ला लागले.उद्देश असा कि,आजी माजी संचालक व आजीमाजी आमदारांच्या विरोधात उमेदवारी करणे.आर्थिक बँकेतील मक्तेदारी मोडून काढणे.बँकेतील काळेगोरे खोदून काढणे.जेणेकरून बँक लुटायची कोणी सराईत चोराने हिंमत करू नये.
    जिल्हा सहकारी बँक ही खास शेती विकासासाठी आहे.कर्ज देणे घेणे सोपे करण्यासाठी आहे.विकास सोसायटी, दूध फेडरेशन जगवणारी आहे.पण तिचा उपयोग साखर कारखाना, हायवेवरील जमीन घेण्यासाठी करीत असतील तर लगाम तर लावलाच पाहिजे. पन्नास हजाराच्या कर्जासाठी शेतकरी ला वणवण फिरलले जाते आणि पंचावन्न कोटी संचालकाला एका साध्या अर्जावर मिळतात.हे थांबवणे गरजेचे आहे.पैसा शिल्लक नाही असे उत्तर शेतकऱ्यांना देणारे संचालक कोटी कोटीचे कर्ज उचलतातच कसे?असा प्रश्न करणारे संचालक जिल्हा बँकेत बसले पाहिजे.
     जिल्ह्यातील आमदार लोकशाही मार्गाने निवडून आलेत.आणि आर्थिक संस्थेत निवडणूक नको.हा दुष्ट हेतु विरोधात आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच जनजागृती चे अभियान राबवत आहोत.लोकांच्या मनापर्यंत पोहचत आहोत.लोक स्वेच्छेने सहभाग घेत आहेत. ही जळगाव बदलाची नांदी आहे.
   यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यात दौरा करू.शेतकऱ्यांना प्रेरित करू.आता मतदान मक्तेदारांना न करता नवोदितांना करा.जो कोणी बँकेत आपली वकालत करील त्याला करा आज जिल्ह्यातील २६ लोक एकत्र आले.स्वेच्छेने आले.आमचा उत्साह वाढवला.हाच उत्साह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे.
  आजची बैठक १२.३०ते ३ वाजेपर्यंत चालली.त्यात कमांडो ईश्वर मोरे, डॉ पृथ्वीराज पाटील, एन जे पाटील,नितीन चौधरी, डॉ सुभाष राणे, सुनिल पाटील,  उमाकांत वाणी अशा धुरंधर लोकांनी मार्गदर्शन केले.राकेश वाघ यांनी संपर्क व नियोजन केले.

...शिवराम पाटील.
9270963122
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.
close