shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस मित्र संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अन्सार शेख यांची निवड



संघटना वाढीसाठी प्रयत्नशील रहाणार - अन्सार शेख

प्रतिनिधी : आसावरी वायकर

अहमदनगर : ५ /   दक्ष पोलीस मित्र संस्थेच्या नगर तालुका अध्यक्षपदी  अन्सार शेख यांची निवड करण्यात आली .हि निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली..

                   अन्सार शेख

   यावेळी बोलताना शहादेव मुंगसे म्हणाले की" दक्ष पोलीस मित्र संघटना नेहमीच पोलिसांच्या हितासाठी व मदतीसाठी तत्पर असते पोलिसांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेमार्फत विविध प्रकारे प्रयत्न केले जातात .

तरुणांनीही आपले कर्तव्य समजून पोलिसांना मदत होईल यासाठी मोठ्या संख्येने पोलिस मित्र संघटनेचे येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

      तसेच अन्सार शेख यांनी नगर तालुक्यात संघटना वाढीसाठी व नगर तालुक्यातील पोलिसांना मदत होईल त्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.       

 यावेळी दक्ष पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा सचिव- शारदा कुलकर्णी, संस्थापक सचिव -पंडित मुंगसे ,खजिनदार -रवींद्र भणगे, जिल्हाध्यक्ष -सोमनाथ वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष- कमलेश काळे,जिल्हा सचिव- उपसचिव- दीपक जाधव व युथ आयकॉन फाउंडेशन चे साबील शेख व शिवहरी म्हस्के आदि उपस्थित होते.
close