प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
धारूर घाटात आज झालेला तिहेरी अपघात हा अंगावर शहारे आणणारा होता . धारूर चा आज आठवडी बाजार असल्या मुळे ट्रपिक जास्त असते परंतु नागरिकांत रोष इतका दिसून येत होता की अक्षरशा धारूर घाटाचे नामकरण करून टाकले. धारूर घाट म्हणण्या पेक्ष्या मृत्यू घाट असे नाव ठेवत लोकांनी आपला आक्रोश वेक्त केला.
ट्रक , टेम्पो व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा टेम्पो खाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धारूर घाटात घडली. गणेश बापूराव फरके वय ३२ रा .केज असे मयत दुचाकी स्वराचे नाव आहे . ते केज शहरातील विराट हाॅटेलचे मालक राजेश फरके यांचे लहान बंधू होते.
धारूर येथील अरूंद असलेला घाट धोकादायक बनला असून मागील दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ४० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत . या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे .धारूर घाटातील धोकादायक वळणाचा व रुंदीकर्णाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे .सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धारूर कडून वीट वाहतूक करणारा ट्रक एम .एच. २० , डी . ई . ५४८७ तेलगाव कडे जात होता .घाटामध्ये धोकादायक वळणाच्या ठिकाणी गेला असता तेलगावकडून कापूस घेवून येणाऱ्या एम . एच . ०४ ई . वाय. ५७१९ या आयसर टेम्पोची समोरासमोर धडक झाली . यावेळी टेम्पो च्या पाठीमागे दुचाकी क्रमांक एम . एच . १२ एच . जे . २८१७ वर दुचाकीस्वार धारूकडे येत होता .जोरदार आयसर टेम्पोला धडक दिल्याने तो ५० फुट पाठीमागे सरकून दुचाकी वर गेला . यावेळी दुचाकीस्वार गणेश बापूराव फडके हा आयशर खाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला .सदरील घटना पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या साह्याने आयसर टेम्पो बाजूला केल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला .दरम्यान अपघातानंतर टेम्पो मधील चालक व वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील चालक घटनास्थळावरून फरार झाले.
पहिल्या अपघात होऊन काही तास होतच नाहीत तोपर्यंत आणखी एक अपघात झाल्याची घटना घडली पाण्याच्या बिसलेरी चे बॉक्स घेऊन येणारा टेम्पो पलटी झाला .Mh 48 j 0887लातूर हुन बिसलेरी घेवून माजलगाव कडे जाणारा टेम्पो
विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हा प्रमुख यांनी लवकरात लवकर एमएसआरडीसी ने दखल घ्यावी
अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा विश्व मानव अधिकार जिल्हा अध्यक्ष अतिक मोमीन यांनी दिला आहे.

