shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उदय शेळके अन् प्रशांत गायकवाड यांचे अजित पवार यांच्याकडून कौतुक..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२१
पारनेर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके व पारनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करत शेतकऱ्यांसाठी सतत काम करत रहा असा सल्ला दिला.
       कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच झाले.
जामखेड येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी शेळके व गायकवाड करत असलेल्या कार्याचे भरभरून कौतुक केले. यावेळी आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
आदर्श काम कसे चालते याचा दाखला देताना मंत्री पवार यांनी पारनेर बाजार समितीच्या कारभाराचा दाखला देत प्रशांत गायकवाड यांचे कौतुक करत सर्व सामान्य शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना केल्या.
    जिल्हा बँकेचा कारभार अध्यक्ष उदय शेळके यांच्या नेतृत्वाखाली उत्तम सुरू आहे. पण काही  शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 
या तक्रारीचा धागा पकडून पवार प्रशांत गायकवाड यांना म्हणाले, तुम्ही केवळ पारनेर तालुक्याचे संचालक नसून पूर्ण जिल्ह्याचे संचालक आहेत. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी काम करा. 
उदय शेळके सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. जिल्हा बँक व महानगर बँक दोन्ही ठिकाणी त्यांचे काम चांगले सुरू आहे. महानगर बँक लवकरच मुंबई येथे स्वमालकीची इमारत उभारत आहे, हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close