महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज असोसिएशन अहमदनगर चा उल्लेखनीय उपक्रम

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : २७ /   महाराष्ट्र राज्य पोलिस बॉइज असोसिएशन तर्फे २६/११ / २००८ रोजीच्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहिद जवान व कोविड काळात वीरमरण आलेल्या पोलिस जवानांना संयुक्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . 

याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील साहेब, पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके.पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, पो.नि.संपतराव शिंदे, पो.नि.ज्योती गडकरी, रा.पो.नि.अनुजकुमार मडापे,पो.नि.राजेंद्र सानप,पो.नि.युवराज आठरे,पो.नि.शिरीषकुमार देशमुख, पो.नि.राजेंद्र भोसले आदी मान्यवरांनी अभिवादन केले . 

यावेळी असोसिएशनचे संस्थापक/अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर, खजिनदार संकेत पवार, सचिव सिद्धांत ससाणे, अविनाश भोईटे, श्रीकांत भालसिंग, नंदकुमार साबळे, सतिष मुंडलिक, वसीम शेख,संतोष सासवडे, तसेच अहमदनगर पोलिस बांधव व नागरिक उपस्थित होते .