शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा
एरंडोल प्रतिनिधी
जिल्हा जाळगाव
प्रमोद चौधरी
एरंडोल:-आज रोजी दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी गुरुवारी महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांची 37 पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अमित राजेंद्र पाटील, संस्थेचे संचालक मा. बापूसाहेब संजय दिगंबर पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. एन. ए. पाटील उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. ए .बडगुजर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा आढावा सर्वांना करून दिला.त्याच बरोबर महाविद्यालयातील इतिहासाचे प्रा.डॉ.बालाजी पवार यांनी मा. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. उपस्थितांमध्ये प्रा. ए.टी. चिमकर , प्रा. के. जे. वाघ प्रा. एन. एस. तायडे ,प्रा. आर.एस. वानखेडे ,प्रा. सचिन पाटील प्रा. डॉ. एस.एल.कोतकर, प्रा.एन. व्ही. दांडेकर, प्रा. डॉ. मीना काळे, प्रा. डॉ. हेमंत पाटील प्रा. डॉ. एस. एम. साळुंखे, प्रा.डॉ. रेखा साळुंखे, प्रा.शर्मिला गाडगे प्रा. उमेश गवई प्रा. डॉ. स्वाती शेलार प्रा. डॉ.सविता पाटील, प्रा. सागर विसपुते ,प्रा. योगेश येंडाईत , प्रा सुनील सजगणे ,प्रा. सुरज वसावे, प्रा. महेंद्रसिंग शिरसाट, प्रा. अतुल प्रा. उमेश सूर्यवंशी तसेच महाविद्यालयातील इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

