शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा
एरंडोल प्रतिनिधी
जिल्हा जाळगाव
प्रमोद चौधरी
एरंडोल/प्रतिनिधी:-आज दिनांक 26 नोव्हेंबर 20 21 रोजी एरंडोल तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसतर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्ष विजय महाजन ,डॉक्टर फराज बोहरी, शहर अध्यक्ष संजय भदाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी डॉक्टर फराज बोहरी यांनी संविधान वाचन केले व प्राध्यापक आर एस पाटील तालुका अध्यक्ष विजय महाजन यांनी संविधान संबंधी मनोगत व्यक्त केले. संजय भदाणे यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी 26/11 च्या झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी युवक तालुका अध्यक्ष इम्रान सय्यद सेवादल तालुका अध्यक्ष संजय कलाल अल्पसंख्यांक शहराध्यक्ष कलीम शेख एजाज अहमद शेख सांडू डॉक्टर जाकिर शेख शेख वसीम शेख अजीज शेख नदीम मन्यार शेख सादिक शेख युसुफ आरिफ मीजवान आयाज मुजावर श्री ठाकूर साजिद परवा नदार इरफान लतीफ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

