shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेली समाज बांधवांची विशेष बैठक उत्साहात संपन्न...!



राहाता । प्रतिनिधी :-
शिर्डी शहर तेली समाजाची श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कनकुरी रोड शिर्डी येथे शिर्डी शहर तेली समाज बांधवांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. ती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

बैठकीतील निम्मलिखित विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने संताजी महाराज जगनाडे जयंती निमित्ताने शासकीय कार्यालयात विधीवत पूजन दि. 8 डिसेंबर 2021 रोजी शिर्डी नगरपंचायत शिर्डी येथे साजरा करण्यात येणार आहे. तसेच शिर्डी शहर अध्यक्ष पदी दीपक चौधरी यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, तर शिर्डी शहर कार्याध्यक्ष पदी सोमनाथ महाले यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उर्वरित पदाधिकारी यांची निवड दि 6 डिसेंबर 2021 रोजी करण्यात येणार आहे, तसेच जयंतीनिमित्त व शिर्डी शहरातील पुढील भविष्यकालीन कामकाजावर चर्चा करण्यात येणार आहे.

यावेळी शिर्डी शहर तेली समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक ज्ञानेश्वर नाना वाघचौरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक चौधरी व कार्याध्यक्ष पदी सोमनाथ महाले यांची निवड करून, यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष ॲड.डॉ.विक्रांत वाघचौरे यांनी संमती दिली व जिल्हा निरीक्षक बद्रीनाथ लोखंडे यांनी पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले व आशुतोष वाघचौरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिर्डी शहर तेली समाजाचे मंगेश कवडे, दिलीप चौधरी, राजू पाडसवान, महेश कवडे,अनिल चौधरी, रवी कर्डीले, विठ्ठल जाधव, नामदेव वाघचौरे, गणेश वाघचौरे, सचिन लुटे, प्रशांत कवडे, नंदकुमार व्यवहारे, यशवंतराव वाघचौरे यांनी मान्यता दिली व पदाधिकारी यांना पूर्ण सहकार्य असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

यावेळी शिर्डी शहर तेली समाज बांधवांच्या सेवेसाठी विविध सामाजीक उपक्रमांची आखणी करून सुरुवात करण्यात येणार आहे तसेच दर महिन्याला समाजाची फिरती बैठक दरवेळी नवीन समाज बांधवांच्या घरी मिटिंग आयोजित करण्यात येणार आहे असा निर्णय नवनिर्वाचित शिर्डी शहर तेली समाजाचे अध्यक्ष दीपक चौधरी यांनी सांगितलेे.
close