बेलापूर । प्रतिनिधी :- गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील नमश्री या मुलीचा उपचार सुरु असताना आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मयत नमश्री शशिकांत शेलार वय ९ वर्ष

               बेलापुर येथील गाढे गल्लीत राहणारे  शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता त्यात घरातील चौघेही गंभीर भाजले होते,त्यांना प्रथम कामगार हॉस्पीटल व नंतर लोणीच्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. यातील शशिकांत शेलार यांची मुलगी नमश्री वय वर्ष ९ हीचे उपचार सुरु असतानाच आज सकाळी निधन झाले. तिच्यावर शेलार स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेलार कुटुंबीयातील तिघांवर अजुनही लोणी येथील प्रवरा हॉस्पिटमध्ये उपचार सुरु असुन या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे, तरी आपण या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन पत्रकार देविदास देसाई यांनी केले असुन आपण ७०२००४९४८४ या मोबाईल नंबरवर फोन पे किंवा गुगल पे वर  मदत पाठवावी असे अवाहन पत्रकार देविदास देसाई यांनी केले आहे.