shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकसहभागातुन शाळेचा विकास ही प्रगल्भ समाजाची निशाणी -पत्रकार रफिक शेख

दानशुर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना केली मदत

प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे

नारायणडोहो : १० /   नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे गावाच्या विकासासाठी व अडचणी समस्यांना वाचा फोडणारे  पत्रकारिता माध्यमातून नेहमी अग्रेसर प्रयत्नशील असणारे पत्रकार रफीक शेख यांचा पत्रकार दिनानिमित्त नारायणडोह गावातील  ग्रामपंचायत आणि शाळेच्या वतीने सत्कार  करण्यात आला.शासकिय गणवेश योजनेचे लाभार्थी नसलेल्या विदयार्थ्यांना लोकसहभागातुन गणवेशाचे वाटप करण्यात आले त्यामुळे सर्व विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसु फुलले.


  या प्रसंगी आपल्या गावातील कर्तव्यदक्ष शिक्षण विस्तार अधिकारी निर्मलाताई साठे आणि त्यांचे बंधू बाबासाहेब साठे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेसाठी डायस (lecture stand) भेट दिले. किशोर गायकवाड यांनी मास्कचे पाकीट दिले.

दानशूर व्यक्तीं
नामदेव गवळी मेजर,संतोष साठे ,किशोर गायकवाड,पोपट जायभाय,ज्ञानेश्वर साठे,किरण गांगर्डे,नवनाथ मोहन साठे, संतोष मिसाळ, बाबासाहेब साठे टाकळी काझी केंद्राचे केंद्रप्रमुख सूर्यभान काळे साहेब यांनी एका गरजू  विद्यार्थिनीसाठी शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी ५०० रुपये दत्तक निधी प्रदान केला.
मागील वर्षी ३५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळवून देणारे माध्य. सो‌. सचिव सोन्याबापू सोनवणे यांना SMC मार्फत आभारपत्र देण्यात  आले. 

यापूर्वी शाळेस भरघोस मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती नवनाथ राजाराम साठे,शारदा ताई जगन्नाथ दरेकर,चांगदेव गुंड, संतोष साठे (मेजर) या सर्वांना
 शाळा व्यवस्थापन समिती मार्फत आभार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पुढील वर्षीची गणवेश तरतूद म्हणून मा.उपसरपंच पोपटराव साठे सर यांनी स्वतः त्यांच्या आई च्या स्मरणार्थ २५०० रू, मच्छिंद्र बाबुराव साठे ५००० रुपये रक्कम, नामदेव गवळी मेजर ५००० रक्कम,पोपटराव घोडके ११००रक्कम ,उपसरपंच पोपटराव बनकर ५०००₹,  सुरेश गोविंद साठे १५००, मच्छिंद्र दगडू साठे १५००₹,(तंटा मुक्ती अध्यक्ष) सूर्यभान अण्णा शिंदे १५००₹  जनाबाई मच्छिंद्र साठे १५००₹ या सर्वांनी आपापल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ ठेव पावती  करून दिली.

याप्रसंगी सरपंच सविताताई किशोर गायकवाड, पोपटराव साठे सर, सोनालीताई अविनाश साठे,सोसायटी चेअरमन मच्छिंद्र बाबुराव साठे, आनंदा साठे, सुरेश साठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र साठे, शिवाजी साठे,पंढरीनाथ साठे, , दिलीप साठे,सुनील ताकटे,ज्ञानदेव साठे, निळु ठोंबरे, पत्रकार रफिक शेख ,केंद्रप्रमुख सुर्यभान काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.सर्व ग्रामस्थांचे शाळेसाठी नेहमीच सहकार्य असते.मुख्याध्यापक संतोष ढगे  यांनी सूत्रसंचालन केले तर सुपेकर सर यांनी 
शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक स्टाफच्या वतीने सर्वाचे मनःपूर्वक आभार  मानले.
close