शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २०२२
‘शाळा बंद, बार चालू.. सरकारची नेमकी दिशा कोणती?’माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात..!!
अहमदनगर : सध्या कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सरकारने विविध निर्बंध लावले आहेत. परंतु आता याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घणाघात केला आहे.
संदर्भात सरकारचे निर्बंध म्हणजे ‘शाळा बंद, बार चालू’ असेच आहेत. त्यामुळे सरकारची नेमकी दिशा कोणती असा सवाल आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करत सरकाराच्या धोरणावर टीका केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर त्यांनी सडकडून टीका केली. कोविड संकटात निर्णय घेताना महाविकास आघाडीत स्वतःची कोणतीही निर्णय क्षमता दिसून आली नाही.
यापूर्वीही सरकारने मंदिर बंद ठेवून मदिरालयं सुरु ठेवली होती, आत्ताही सरकारच्या निर्बंधांमध्ये तीच परिस्थिती आहे. १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
मात्र दुसरीकडे परमिट रुम सुरु ठेवण्यावर सरकारचे कोणतेही बंधनं नाहीत यावरुनच या सरकारची दिशा कोणती आहे हे समजते असा घणाघात त्यांनी केला आहे. केवळ सामान्य माणसाने नियम पाळावे अशी अपेक्षा सरकार करणार असेल तर ते चुकीचे आहे.
राज्यात एकीकडे नियम लादायचे आणि मुंबई मात्र सर्रासपणे सुरू ठेवायची. मुंबई काय राज्यापासून वेगळी आहे का? केवळ महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे.
मात्र मुंबई पुरते निर्णय करताना राज्यातील अन्य भागातील नागरिकांचाही विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

