इंदापूर शहरातील प्रसिद्ध बायोडायव्हर्सिटी पार्क मधील वृक्षांचा वाढदिवस आणि इंदापूरच्या नगराध्यक्षां अंकिताताई शहा यांचा वाढदिवस
साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकिता मुकुंदा शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मागील वर्षी १६ जानेवारी २०२१ रोजी स्मशानभूमी शेजारी असलेल्या पूर्वीच्या कचरा डेपो म्हणून ओळख असलेल्या जागी वृक्षारोपन करत बायोडायव्हर्सिटी पार्क निर्माण करण्यात आले आहे. या बायोडायव्हर्सिटी पार्क ला १६ जानेवारी २०२२ रोजी एक वर्ष पूर्ण झाले.त्या निमित्ताने नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते या वृक्षांना हार घालून केक कापत या बायोडायव्हर्सिटी पार्कचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचवेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांचा ही वाढदिवस साजरा केला.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे,सामाजिक कार्यकर्त्या सायरा आतार, हमीद आतार, जावेद शेख,नगरपरिषदे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये विविध प्रकारच्या चाळीसहून अधिक औषधी व फळे फुल झाडांचा समावेश आहे. एक वर्षापूर्वी नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निर्माण करण्यात आलेले हे पार्क शहराच्या सुंदरतेचा एक भाग ठरत असून या पार्कला अनेक प्रशासकीय अधिकारी व राजकिय मंडळींनी भेटी दिल्या आहेत. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टातून फुलवलेल्या या बगिच्यातील वृक्षांना कर्मचाऱ्यांनी विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट केली होती.

