शिरसाटवाडी येथे घराला आग लागून संसारिक गोष्टी जळून खाक झाल्या त्या ठिकाणी राज्यमंत्री भरणे यांनी भेट देऊन तात्काळ मदत करण्याचे प्रशासनाला दिले निर्देश.
इंदापूर प्रतिनिधी: शिरसटवाडी येथील सोपान सदाशिव जाधव यांच्या घराला मागील चार दिवसापूर्वी विजेचे शाॅर्ट सर्कीट होऊन आग लागली. या आगीत जाधव कुटुंबाचे अंदाजे २ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. इतर संसारिक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी दि.१६ जानेवारी रोजी शिरसटवाडी येथे जावून जाधव कुटुंबाची भेट घेतलीय.
आता खचून जाऊ नका कोणतीही मदत लागल्यास मला कळवा हा मामा कायम तुमच्या सोबत आहे असा विश्वास देखील यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी जाधव कुटुंबाला दिला.
जाधव यांचे घर शॉर्टसर्किटमुळे जळाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शिरसटवाडी येथे गेले होते.त्यांनी सोपान जाधव यांच्या घराची पाहणी केली. पहाणी करुन तहसिलदार,महावितरण चे अधिकारी व गाव कामगार तलाठी यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून संबंधित घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश भरणे यांनी दिले आहेत. शिवाय तात्काळ त्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याची ही व्यवस्था करण्यास कळवले आहे.यावेळी अँड.नितीन कदम, सुभाष भुजबळ, संचित नागळे, गिरीष जाधव आदी उपस्थित होते

