इंदापूर शहरात दलीतवस्ती योजनेतून २ कोटी १० लाख व अंतर्गत बंदिस्त गटर कामाकरिता नगरोत्थान योजनेतून ६७ लाख निधी मंजूर - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरातील साठेनगर येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाकरिता दलीतवस्ती योजनेतून २ कोटी १० लाख व अंतर्गत बंदिस्त गटर कामाकरिता नगरोत्थान योजनेतून ६७ लाख निधी मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की इंदापूर शहराच्या विकासात निधीची कमतरता भासणार नाही.
इंदापूर तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरू असून हा विकास सतत पुढे असाच सुरू राहील असा आशावाद यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.
यावेळी इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

