पूर्णा । प्रतिनिधी :-
पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून पठ्ठे बापूराव पासून ते आजच्या आधुनिक संगणक विज्ञान युगातील कलेपर्यंत चाळ आणि टाळ या दोन्ही कडे भक्तिभावाने पाहिली जाते कधी एके काळी ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या जनतेला सर्कस पाहण्याची ओढ शहराकडे घेऊन येत होती.

परंतु आता ही सर्कस हद्दपार झाली असून एकमेव ग्रामीण भागामध्ये कला बघण्याची माध्यम म्हणून तमाशाकडे पाहिली जात होती, सलग तीन वर्षापासून तमाशा बंद असल्यामुळे तमाशातील घुंगरांचा आवाज मुका झाला असून हजारो तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली.हे चित्र संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाहावयास मिळत आहे.

मराठमोळ्या रसिकांची महाराष्ट्रातील लोकल द्वारे अनेक वर्षापासून तमाशा हा ग्रामीण भागातील मंडळीच्या मनोरंजनाचा एक साधन होते.ग्रामीण भागातील जत्रांमध्ये दहा ते पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत रसिके आपल्या बैलगाडी द्वारी वेगवेगळ्या जत्रेमध्ये आलेल्या तमाशांचे फड पाहण्यासाठी रात्री नऊ पासून ते रात्री 12 पर्यंत गर्दी करून लोककलेचा मनमुराद आनंद घेत होते.

लावणी आणि वग हे दोन तमाशातील अंग होते तर काळूबाळू चा समाधान रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा होता. अगदी प्रतिकूल परिस्थितीत सामना करत मागील शंभर वर्षापासून आजवर संपूर्ण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये लोकनाट्य तमाशा ची परंपरा जोपासली परंतु आजच्या आधुनिक विभागांमध्ये मोबाईलवर युट्युब वर आणि टीव्हीवर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे तमाशाला रसिकांचा प्रतिसाद मिळाला नाही तर वाढती महागाई तमाशा सादर करताना लावणी साऊंड सिस्टिम डेकोरेशन इतर साहित्य व वाहनाचा अवाढव्य खर्च कर्मचाऱ्यांचा पगार या खर्चाचा ताळमेळ आणि तमाशा रसिकांची तमाशाकडे फिरवलेली पाठ.. त्यामुळे आयोजित तमाशा मंडळांना त्याला सामोरे जावे लागत आहे. अशी तारेवरच्या कसरती करत बोटावर मोजण्याइतके तमाशा मंडळ मराठवाड्यामध्ये तग धरून होते, परंतु मागील तीन वर्षापूर्वी संपूर्ण जगात देशात राज्यामध्ये लाॅक डाऊन चे संकेत आले. महामारी ने सगळी अर्थव्यवस्थाच बंद केली. रेल्वे पासून ते ग्रामीण भागातील एसटी पर्यंत सर्वांवर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या निर्बंधामुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये दिवाळी पासून ते जून पर्यंत गाव पातळीवर छोट्या-मोठ्या भरणाऱ्या जत्रा वर बंदी आली. जत्रा नोट बंदी आल्यामुळे तमाशा कलावंत ही कलेपासून दूर गेला. तीन वर्षापासून यात्रेनिमित्ताने लोकसमुदाय तमाशासाठी कला पाहण्यासाठी गावा गावामध्ये जात होता, अनेक गावात विविध जाती धर्मातील देवदेवतांच्या जत्रां, यात्रा मोठ्या प्रमाणात भरत परंतु या जत्रांना नाकारल्याने महाराष्ट्रातील तमाशांना बंदी आली. या बंदीमुळे मागील तीन वर्षांपासून मराठवाड्यात कुठे जत्रा भरत नाही. जत्रा भरत नसल्यामुळे तमाशा कलावंत यांच्या कलेला कोणीच विचारत नाही. तमाशा फड मालकांना व तमाशा कलावंतांना सध्या खेळ सादर करण्यासाठी बंदी असल्यामुळे अनेक कलावंत घरीच बसून आहेत. त्यामुळे या कलावंतांना राज्य सरकार कडून आणि कलावंतांच्या तमाशा ला परवानगी नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत असून याकडे सरकारने काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी गोदाकाठच्या कलावंतांमध्ये व्यक्त केली जात आहे.

अनेक उर्सा वर बंदी
परभणी नांदेड हिंगोली पूर्णा कळमनुरी वसमत अनेक शहरांमध्ये ग्रामीण भागात परंपरागत जत्रा भरत असताना या जत्रांमध्ये ऊरुस यावर सुद्धा बंदी असल्यामुळे कवाली सारखे कार्यक्रम आहे ठप्प झाली आहेत. त्यामुळे जुनी कला, सर्कस व तमाशा ही लोप पावत असल्यामुळे रसिकांची मात्र गैरसोय होत आहे.हे मात्र निश्चित..!