शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२

महसूलमंत्र्यांच्या हस्ते निमज येथे विकास कामांचा शुभारंभ आणि लोकापर्ण सोहळा..!!



संगमनेर : तालुक्यात असलेल्या निमज ते वडापूर या अंतर्गत सहा कोटी रुपये निधीतून उभारलेल्या पूलाचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचे लोकार्पण मा.ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकताच झाला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे, जि.प.सदस्य रामहरी कातोरे, लक्ष्मणराव कुटे, शेतकी संघाचे उपाध्यक्ष संपतराव डोंगरे, सौ. मीराताई शेटे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, संतोष हासे, सौ.निषाताई कोकणे, विष्णुपंत रहाटळ, पांडुरंग पा. घुले, सौ जिजाताई शिंदे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, अनिल काळे, विनोद हासे आत्माराम हासे , सुहास आहेर, विलास कवडे, सरपंच गोरख डोंगरे, उपसरपंच विलास कासार, विवेक कासार, रामनाथ डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी संगमनेर ते सावरचोळ या रस्त्याच्या डांबरीकरण मजबुतीकरण कामाचा शुभारंभ तसेच विविध रस्त्यांच्या कामाचे लोकार्पण व वाडापूर निमज या महत्त्वपूर्ण पूलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. या प्रसंगी बोलताना ना.थोरात म्हणाले की संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका होता मात्र तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी केलेला पाण्यासाठीचा संघर्ष आणि त्याला दिलेली कार्यकर्त्यांनी साथ यामुळे तालुक्यात पाणी पुरवठा संस्थांचे जाळे उभे राहिले. त्यातून अनेक कार्यकर्ते घडले. आज राज्यातील सर्वात चांगला कार्यकर्त्यांचा संच असलेल्या संगमनेर तालुका आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने सातत्याने आपल्यावर प्रेम केले. त्यामुळे विधानसभेत सलग आठ वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पस्तीस वर्षे अविश्रांत काम केले. निळवंडे धरण पूर्ण झाले आहे. कालव्याची कामे कोरोना संकटातही वेगाने सुरू असून या कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला पाणी देणे हेच आपले ध्येय आहे. मोठे कष्ट व संघर्षातून तालुका विकसित व वैभवशाली झाला आहे. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था ह्या इतरांना दिशादर्शक आहेत. शिखर संस्था व गावोगावच्या सहकारी संस्था यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. तालुक्यातील ग्रामीण पतसंस्थांमध्ये 2100 कोटींच्या ठेवी आहे हे समृद्धीचे प्रतिक आहे. मात्र ही वैभवशाली परंपरा आपल्याला जपायची आहे.

महाविकास आघाडी सरकारने कोरोना, नैसर्गिक संकटे, चक्रीवादळे, अशातही सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा दिला असून शेतकऱ्यांसाठी सुमारे 25 हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. शेतकऱ्यांना मदत करणे हेच सरकारचे काम असून कोरोणा संकटात पूर्ण पारदर्शकपणे काम केले आहे. उलट ज्यांनी आकडे लपवले त्यांच्या राज्यातील जनतेचे मृतदेह लोकांनी गंगेत पाहिले असल्याची टीकाही नामदार थोरात यांनी केली.

तर आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत असलेल्या संगमनेर तालुका असुन सहकार, शिक्षण,आर्थिक समृद्धी,शेती अशा विविध क्षेत्रात संगमनेर तालुका हा इतरांसाठी मॉडेल ठरला आहे. ना.थोरात हे राज्यात काम करत असले तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासावर त्यांचे लक्ष आहे..!

तर यावेळी माधवराव कानवडे म्हणाले की,सहकार हा संगमनेरच्या विकासाचा पाया असून ना.थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांमधून मोठी समृद्धी निर्माण झाली आहे. पाईपलाईनचे जाळे ते आज पर्यंत संघर्षाचा इतिहास तालुक्याला आहे. निळवंडे धरणाचे काम ना. थोरात यांनी पूर्ण केले असून कालव्याद्वारे पाणी देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहे. तर जि.प.सदस्य राम हरी कातोरे म्हणाले की, पश्चिम भाग हा कायम नामदार थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून सावरचोळ ते संगमनेर हा महत्त्वपूर्ण रस्त्यासाठी ना.थोरात यांनी मोठा निधी दिला आहे. वाडापूर ते निमज या पुलामुळे वाहतुकीसाठी सोय होणार असून चिखली- वाडापूर निमज आणि पश्चिमेकडील गावे संगमनेरशी जोडले जाणार आहेत. विकास कामांचा वेग कोरोणा संकटकाळी कायम ठेवला असल्याचे ते म्हणाले. तर निमज येथील युवा प्रतिष्ठाणने गावातील युवकांच्या वाढदिवसाचा खर्च न करता ती रक्कम गावातील वनराई वाढवण्यासाठी व सामाजिक कार्यासाठी वापरली आहे. यातून गावांमध्ये तीन हजार वृक्ष उभे राहिले असून गाव हिरवेगार होण्यास मोठी मदत झाली आहे. हा एक आदर्श पॅटर्न असल्याचे गौरवोद्गार रामहारी कातोरे यांनी काढले..!

या वेळी माधवराव हासे, सुदाम महाराज कोकणे, अरुण गुंजाळ, गंगाधर डोंगरे, दिलीप कासार, रामचंद्र शेटे, विजय गुंजाळ, गोरख डोंगरे, मंगेश मतकर, सागर डोंगरे, संतोष डोंगरे ,शिवाजीराव फटांगरे, शरद कोकणे, नवनाथ कातोरे,रोहीदास खताळ,मुख्याध्यापक भारत कुटे, निखिल कातोरे, बिडीओ अनिल नागणे सौरभ पाटील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600