शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२
बेलापूर गॅस टाकी स्फोटाचा दुसरा बळी;लहान मुलीनंतर मुलीच्या आईचा दूर्दैवी अंत..!!
श्रीरामपुर : बेलापूर गावातील गाढे गल्ली भागात राहणारे शेलार कुटुंबीयांच्या घरात 6 जानेवारी रोजी गॅस टाकी चा स्फोट झाला होता.त्यामध्ये शेलार यांच्या घरातील चार जण गंभीर जखमी झाले होते.त्यातील शशिकांत शेलार यांची मुलगी नमोश्री शशिकांत शेलार,वय-८ हिचे गेल्या आठवड्यात या घटनेत भाजल्यामुळे निधन झाले. तर आज शशिकांत शेलार यांच्या पत्नी ज्योती शेलार यांचे लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले आहे.
या घटनेमुळे शेलार कुटुंबीयांवर दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर कोसळला असून त्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे.तरी दानशूर व्यक्तींनी बेलापूरातील शशिकांत शेलार यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

