तरंगवाडीच्या  सरपंचपदी सौ कान्हुपाथरा  जाधव  तर कांतीलाल  तरंगे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी:तरंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ कान्हुपाथरा गोविंद जाधव यांची तर कांतीलाल गेना तरंगे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड
 झाली .सौ सविता बुनगे यांनी सरपंचपदाचा तर आप्पासाहेब शिंदे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त  पदांवर सौ जाधव व श्री तरंगे यांची बिनविरोध निवड झाली. डॉ शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखालील तरंगवाडी ग्रामपंचायत मध्ये ९ पैकी ९ जागा जिंकून सत्ता स्थापन करण्यात आली आहे .
सदर उपसरपंच पदाची निवड तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली. तर सरपंच पदाची निवड दि.६ जानेवारी २०२२ रोजी मंडलाधिकारी एस.बी. हजारे व ग्राम विकास अधिकारी दादासाहेब वाघ यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया संपन्न झाली.
नुतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार डॉ शशिकांत तरंगे, बाळासाहेब चितळकर, अजिनाथ तरंगे,बापूराव तरंगे, सचिन तरंगे उपसरपंच गोखळी ,महादेव वाघमोडे, तुकाराम करे,सुहास बुटे,अण्णासाहेब तरंगे,महादेव शिंदे,लक्ष्मण बनसोडे, कांतीलाल बुनगे,दादा माने पोलीस पाटील शिवराज गावडे , वैभव तरंगे दिपक डोंबाळे,यशवंत तरंगे,सचिन हरणावळ, दत्तात्रय चितळकर,नामदेव क्षीरसागर तुषार बुटे,आप्पा बुटे, रणजित बुटे, बाळासाहेब बुटे, दीपक भोसले यांनी केला.