सामोडे । प्रतिनिधी :- साक्री तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने थोर समाजसेविका पघश्री पुरस्कार सन्मानित सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी साक्री तालुका भाजपा अध्यक्ष मा वेडु आण्णा सोनवणे पिंपळनेर मंडळ सहकार आघाडी अध्यक्ष दिलीप घरटे राकेश दहिते विनोद पगारिया दिनेश नवरे भाजपा जेष्ठ नेते बापूसाहेब मालचे विनोद पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनांथाचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 73 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना अतिशय दुख:द घडली.
सिंधुताई सपकाळ यांच्या आकस्मिक निधनाने अनांथाचा आधार हरपला असल्याच्या शोकभावना दिलीप घरटे यांनी व्यक्त केली. यावेळी तालुका भाजपा कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.

