प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
उसने पैसे देण्यास नकार दिल्याने आई विषयी अपशब्द बोलून दोघांनी मारहाण केल्यामुळे अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बनकरंजा येथे वसंत लांब त्यांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल आहे. दि ९ जानेवारी रविवार रोजी सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान वसंत लांब त्यांच्या शेतातील विहिरीत पाणबुडी मोटार टाकण्यासाठी शेतात गेले होते. त्यामुळे त्यांचा १७ वर्ष वयाचा मुलगा विक्रम लांब हा हॉटेल सांभाळत होता. त्या वेळी बनकरंजा येथील कापले वस्ती येथे राहत असलेले बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब (नागरगोजे) हे दोघे हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे २ हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. परंतु जवळ पैसे नसल्याने विक्रमने त्यांना पैसे देण्या नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब (नागरगोजे) या दोघांनी विक्रम जवळ कुटुंबातील व्यक्ती आणि आई बद्दल अपशब्द वापरले. तसेच त्याला चापटा बुक्याने मारहाण केली. वडील वसंत लांब हे शेतातून आल्या नंतर विक्रमने रडत रडत त्यांना घडलेली घटना सांगितली. वडिलांनी त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या आई विषयी त्यानी वापरलेले अपशब्द त्याच्या जिव्हारी लागल्याने विक्रम अस्वस्थ होता. त्या नंतर रात्री ९:०० वा. विक्रमने बाथरुममध्ये जाऊन खिडकीला अंगावरील शर्टाच्या साह्याने गळफास घेतला. याने गळफास घेतल्याचे दृष्टीस पडताच त्याचा गळफास सोडवून त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
या प्रकरणी मयत विक्रम लांब यांच्या वडिलांनी दि. १३ जानेवारी रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब (नागरगोजे) दोघे रा. बनकरंजा यांच्या विरुद्ध गु.र.नं. १०/२०२२ भा.दं.वि. ३०५, ३२३, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे पुढील तपास करीत आहेत.
येथे दि ९ जानेवारी रविवार रोजी रात्री ९:०० वा च्या दरम्यान
यावेळी वापरलेले अपशब्द जिव्हारी लागल्याने दुखावलेल्या त्या मुलाने बाथरुममध्ये जाऊन शर्टाने गळफास घेतल्याची घटना तालुक्यातील बनकारंजा येथे घडली
विक्रम वसंत लांब ( वय १७ , रा . बनकरंजा , ता . केज ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे आहे . विक्रमच्या वडिलांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल आहे . रविवारी ( दि . 9 ) सायंकाळी 5 वाजता त्याचे वडील पाणबुडी मोटार टाकण्यासाठी शेतात गेले होते . त्यामुळे विक्रम हॉटेल सांभाळत होता . यावेळी गावातील बळीराम नानासाहेब लांब व सुभाष नवनाव लांब हे दोघे हॉटेलवर आले . त्यांनी विक्रमकडे दोन हजार रुपये उसने देण्याची मागणी केली . परंतु , जवळ पैसे नसल्याने विक्रमने त्यांना नकार दिला . त्यामुळे चिडलेल्या त्या दोघांनी विक्रमजवळ कुटुंबातील व्यक्तीबद्दल अपशब्द वापरले आणि आणि त्याला चापटाबुक्याने मारहाण केली . वडील शेतातून आल्यानंतर विक्रमने रडत रडत त्यांना घडलेली घटना सांगितली . वडिलांनी त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला , परंतु अपशब्द जिहारी लागल्याने विक्रम शांत होत नव्हता . त्यानंतर घरी असताना 9 वाजता विक्रमने बाथरुममध्ये जाऊन खिडकीला अंगावरील शर्टाच्या साह्याने गळफास घेतला .

