shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजा माणूस म्हणून सर्वांना परिचित असलेल्या राजाभाऊ (अण्णा)कुसळकर यांचे निधन..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क :-

सोनई - घोडेगाव रोडलगत असलेले प्रतिथयश शेतकरी, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष व मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाभाऊ(अण्णा) चिमाजी कुसळकर वय- ७१ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच पुणे येथे निधन झाले.

त्यांना हृदयनाथ मंगेशकर इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले रमेश व राहुल, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पुणे येथील प्रा.रामदास कुसळकर व वसंत कुसळकर,सोनई यांचे ते जेष्ठ बंधू होत.

राजाभाऊ (अण्णा) सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात परिचित होते. त्यांच्या पार्थिवावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.१४ जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजाभाऊ एक दिलखुलास व हसतमुख व्यक्तिमत्त्व..!

राजाभाऊ (अण्णा) हे सदैव टेन्शन फ्री व्यक्तिमत्त्व.. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही टेन्शन दिसत नसे, गावातील व मित्रमंडळींच्या सुखदुःखात सदैव हजेरी लावत. त्यांचे प्रेमळ वागणे व सुसंस्कृतपणा समाजातील प्रत्येक घटकाला प्रभाव पाडणारे होते. लग्न कार्य व इतर नियोजित कार्यक्रम अगदी वेळेत करण्यासाठी त्यांचा  मोठा हातखंडा असे, म्हणून अनेक मित्र व पाहुणे मंडळी त्यांना कार्यक्रमात आघाडीचे स्थान देऊन त्यांना मानसन्मान करत. 

राजाभाऊ (अण्णा) गडाख परिवारातील एक विश्वासू सदस्य होते. त्यामुळे त्यांनी या परिवाराची अखेरपर्यंत साथ सोडली नाही. विश्वास राव गडाख पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. ‌सामाजिक कार्यकर्ते, अखिल महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष, मुळा सहकारी साखर कारखाना,सोनई चे माजी संचालक,प्रथितयश शेतकरी, भुविकास बॅंकेचे माजी संचालक, श्रीरामपूर दूध संघाचे माजी संचालक,मुळाचे संचालक , बालाजी मंदिर देवस्थान ,सोनई चे अध्यक्ष असे विविध पदे भुषविले असून सोनई गावात त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. अण्णांनी जीवनामध्ये अनेकांना आयुष्यभर सहकार्य करण्याचे मोलाचे कार्य केले.

सतत हसतमुख चेहरा असलेले अण्णा आपल्यातून निघून गेलेअसले तरी अण्णांनी केलेलें कार्य सदैव अमर आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो..! हीच  "आदरणीय राजाभाऊ (अण्णांना ) भावपूर्ण श्रद्धांजली" 🙏

सामाजिक कार्यकर्ते ‌श्री.गोरक्षनाथ‌ कुर्हाडे, श्रीरामपूर..
close