शिवरामपुरी पतसंस्थेच्या 9 व्या शाखेचा युसूफवडगाव येथे शुभारंभ..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
शिवरामपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने ग्राहकांच्या विश्वासावर यशस्वी वाटचाल केली आसून आज युसूफवडगाव व परिसरातील नागरीकांच्या सेवेत विक्रम बप्पा मुंडे यांनी शिवरामपुरी पतसंस्थेची शाखा कार्यरत केली आसून शिवरामपुरी पतसंस्थेच्या आजतागायत आठ शाखा कार्यरत आसून ग्राहकांच्या विश्वासावर शिवरामपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने ग्राहकांच्या विश्वासावर यशस्वी वाटचाल केल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे केज तालुकाध्यक्ष बालासाहेब बोराडे यांनी केले आहे.
केज तालुक्यातील विडा येथिल शिवरामपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालत आसलेल्या पतसंस्थेने अल्पावधीतच नावलौकिक केले आसून आजपर्यंत पतसंस्थेच्या आठ शाखा कार्यरत आसून गुरूवारी युसुवडगाव येथे नवव्या शाखेचा शुभारंभ ह. करण्यात आला आसून ह.भ.प.श्री.श्रीराम महाराज विडेकर,ह.भ.प.महादेव महाराज बोराडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे आध्यक्षस्थानी माजी जि.प.उपाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे यांची उपस्थिती होती दरम्यान ग्राहकांच्या विश्वासावर शिवरामपुरी पतसंस्थेने यशस्वी वाटचाल केल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बाबासाहेब बोराडे यांनी मार्गदर्शन करताना केले.प्रसंगी माजी जि.प.सदस्य महारूद्र लामतुरे,जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,पंचायत समिती सदस्य बंडाप्पा भुसारी,सरपंच राजेभाऊ जावळे,जाधव साहेब,सुरेश चोपणे,दिलीप पाटील,रंगनाथ थळकरी,अनिल चोपणे,रूपेश बोरगावकर,शिवहर थळकरी,अध्यक्ष बाबासाहेब मुळे,तुळशीराम तोंडे,पी.डी.मुरकुटे गुरूजी,जेष्ठ नेते अशोक वाघमारे,लिंबराज ढेंगे,वसुदेवराव मुंडे,राधाकिसन मुंडे,माणीक जोगदंड,राजेंद्र पटाईत,बप्पा बर्दापूरकर,विठ्ल भोसले,देवगावचे उपसरपंच अतुल मुंडे,पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिता पवार व कृष्णा बँकेचे सर्व शाखा व्यावस्थापक,शिवरामपुरी पतसंस्थेचे सर्व शाखा व्यवस्थापक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान कार्यक्रमाचे उत्कृष्टसूत्रसंचालनकिशोर कन्हेरे यांनी केले.

