वार्ड 16 मधून पल्लवी ओमप्रकाश रांजनकर 161 मतांनी विजयी बनल्या किंगमेकर..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकित मा. खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी पक्षाची धडाकेबाज एंट्री झाली असुन वार्ड 16 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,जनविकास आघाडी,शिवसेना आदी प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांविरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पक्षाच्या उमेदवार पल्लवी ओमप्रकाश रांजणकर तब्बल 161 सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या आहेत.
निवडणूक निकालानंतर केज शहरात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून ,पेढे भरवून ,फटाक्यांची आतषबाजी करत विजयोस्तव साजरा केला.
यावेळी युवती आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, स्वाभीमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजनकर, केज शहराध्यक्ष फेरोज भाई पठाण, तालुकाध्यक्ष बिभीषण इंगळे, विश्वास जाधव,प्रमोद पांचाळ,अशोक साखरे,सुग्रीव करपे,मयूर रांजनकर, आदित्य रांजनकर, ओमप्रकाश रांजनकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
केज नगरपंचायत निवडणूकित स्वाभीमानी पक्षाच्या विजयी उमेदवार पल्लवी रांजनकर किंगमेकर ठरल्या असून
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष मा. खा. राजू शेट्टी ,प्रदेशाध्यक्ष प्रा.जालंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या राजकिय व्यवहार समिती ची बैठक होईल बैठकीतच पुढिल निर्णय घेतला जाईल अशी माहिती भेटत आहे* *तर रमेश आडसकर व अंकुश इंगळे यांचे राजंणकर घराण्याशी असलेल्या घट्ट संबधामुळे शिट्टी जनविकास परिवर्तन आघाडीला समर्थन करेल अशी जोरदार चर्चा केज शहरात सुरू आहे
केज नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या प्रतिष्ठेची लढाई होती परंतु जनविकास परिवर्तन आघाडीचे सुग्रीव कराड हे दोन वर्षांपासुन लाॅकडाऊन पासुन् या भागातील जनतेच्या सेवेत होते. त्यांच्या सौ.आशाबाई सुग्रीव कराड यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉ. हर्षदा सोनवणे यांचा पराभव करून बीड जिल्हात इतिहास निर्माण केला आहे.
या निकालामुळे सुग्रीव कराड यांचे जिल्ह्याभर कौतुक केले जात आहे.

