शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२
गरीब मुलांना हक्काचे जेवणाचे ताट तसेच रक्तदान शिबीर अश्या विविध सामाजिक कार्यक्रमाने राहुरीत शिवजन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न..!!
राहुरी : राहुरी तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील गरीब मुलांना जेवणाचे ताट, फळआहार तसेच सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिराचे आयोजन करुन शिवरायांचा जन्म उत्सव सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव डावखर होते.
राहुरी तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रगणी असणार्या अखिल भारतीय मराठा महासंघ, शिव प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, संत सावता माळी युवक महासंघ, हरणाई ग्रुप, मोर्या ग्रुप, महाराणा प्रतिष्ठान, कोराना वाॅरीयर्य टिम, जेष्ठ नागरिक संघटना आदी समविचारी संघटना गेली चार वर्षा पासून शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. या वर्षी संयोजन समितीच्या वतीने शिवरायांच्या जन्मोत्सव निमित्ताने संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक करतांना रमेश बोरुडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमा बाबत माहीती दिली. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात आले. गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर काही गीत सादर केले त्यानंतर गरीब मुलांना जेवणाची ताटे तसेच त्या बरोबर फळांसह अल्पोपहार वाटण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील जेष्ठ व्यक्तीमत्व ह भ प नारायणराव भगवंतराव डौले नाना यांनी वयाची शंभर वर्षं पूर्ण केल्याबद्दल संयोजन समितीचे वतीने जेष्ठ नागरीकांच्या हस्ते त्यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ह भ प डोलै नाना यांचा विवीध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे पन्नासहून अधिक नागरीक या उपक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य शहरातील प्रतिष्ठित व्यापारी रामदास नाना बोरुडे, सदाशिव पवार, सुर्यभान कदम, देशमुख साहेब, राहुरी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आर आर पाटील तनपुरे, माजी नगरसेवक सागर तनपुरे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, अक्षय तनपुरे, दिलीपराव चौभारे, विलासराव वराळे, जोगेश्वरी सोसायटीचे संचालक रोहीदास धनवडे, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र काळे पाटील, प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकरराव घाडगे, गाडगेबाबा आश्रम शाळा संचालिका भारती खिलारी मॅडम, यशवंतराव खिलारी, ऐजाज पठाण, राजेंद्र कांबळे, केशर पतसंस्थेचे सागर तनपुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ सूर्यवंशी आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
संयोजन समितीचे शिवाजीआप्पा डौले, डॉ प्रकाश पवार, अॅड राहुल भैय्या शेटे, रमेश बोरुडे, अतुल तनपुरे, मच्छिंद्र गुंड, डॉ नरेंद्र इंगळे, डॉ किशोर पवार, बाळकृष्ण वाघ, तुषार तमनर, नारायण निमसे, रोहन पंडित, डाॅ. बजरंग पवार, पोपटराव शिरसाट, प्रदीप भुजाडी, गोरक्षनाथ अडसुरे, आबासाहेब शेटे, शरद म्हसे, कांता तनपुरे, अशोकराव तुपे, सचिन बोरुडे, जीवन गुलदगड, दता पेरणे, संदिप कवाणे, आंबेकर, सचिन जाधव, टिकू जाधव, संजय जाधव, सिध्दांत रासणे, डॉ अमित भुजाडी, शामराव कदम, अमोल अडसुरे, किशोर अडसुरे, अभिषेक अडसुरे, निखिल अडसुरे, रामनाथ अडसुरे, भारत अडसुरे, संकेत दुधाडे, दादा घोडकेे, निलेश उदावंत, राकेश शेटे, सौरभ दुधाडे, शरद पाचारणे आदींसह रक्तदान शिबिर याकरिता रोटरी ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी तसेच डॉक्टर्स उपलब्ध होतेे. शेवटी डॉ नरेंद्र इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
✒️Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

