शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२
शिर्डी विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा,मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे काकडीच्या ग्रामस्थांची मागणी..!!
शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवावा अशी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडे काकडीच्या ग्रामस्थांच्या वतीने युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी विमानतळावर केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, राहाता तालुक्यात महाराजांचा अतिरिक्त पुतळा गोडावून मध्ये बंदीस्त आहे. तो पुतळा काकडी येथील विमानतळाच्या परिसरात बसवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरात बसविल्यास विमानतळाच्या वैभवात भर पडेल.
आठ दिवसापुर्वी ना. गुलाबराव पाटील यांचेकडेही अशाच आशयाचे निवेदन विमानतळावर देऊन मागणी केली होती. निवेदनावर काकडीचे युवा सेनेचे अध्यक्ष अक्षय गुंजाळ, दत्ता भालेराव, प्रभाकर गुंजाळ, समाधान सोनवणे, संजय गांगुर्डे, योगेश गुंजाळ, वैभव भालेराव यांच्या सह्या आहेत.
✒️Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

