shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथे स्वराज्य क्लासेस शैक्षणिक अद्ययावत संकुलाचे नूतन शाखेचे भूमिपूजन संपन्न.

बावडा येथे स्वराज्य क्लासेस शैक्षणिक अद्ययावत संकुलाचे नूतन शाखेचे भूमिपूजन संपन्न.

विद्यार्थ्यांसाठी होस्टेल , मेस इत्यादी अद्यावत सेवा सुविधा  उपलब्ध करून देण्याचे नियोजन.
इंदापूर प्रतिनिधी: बावडा गावाच्या वैभवात भर पडणार.अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर
बावडा येथे श्री.शिवाजी विद्यालय नजीक अकलूज-इंदापूर रोड, गणेशनगर येथे स्वराज्य फाऊंडेशन अंतर्गत "स्वराज्य क्लासेस"  या शैक्षणिक संकुलाचे  भूमीपूजन कार्यक्रम श्री.महेश विलास जगताप यांचे शुभहस्ते(दि.१९) रोजी संपन्न झाला.
यावेळी स्वराज्य फाऊंडेशनचे संचालक प्रा.अतुल गुळवे, प्रा. प्रशांत शेटे, प्रा. प्रकाश धाईंजे सर यांनी बावडा व इंदापूर परिसरात विद्यार्थ्यांना एक दर्जेदार ॲकॅडमी उपलब्ध करून देणेचा मानस व्यक्त केला.

तसेच स्वराज्य क्लासेस" वतीने  घडवलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय कॉलेज, मेडिकल क्षेत्रातील एम. बी. बी. एस, एयर पायलट, इंजिनीअरिंग, बी.एसी अ‍ॅग्री,फॉरेन्सिक सायन्स, एल.एल.बी , इ. ठिकाणी प्रवेश मिळाला आहे.सदर शिक्षक संबंधित विषयांचे शासनाच्या नियमानुसार एम.एस्सी; बी एड उच्च शिक्षीत तज्ञ आणि मागील १२ वर्षांपासून यशस्वी रित्या जेईई, नीट, सीईटी चे रेग्युलर तसेच क्रॅश कोर्स माध्यमातून अगदी कोटा पॅटर्न चा अभ्यास करून घेत आहेत.विद्यार्थ्यांच्या एनटीए नीट,  जेईई , सीईटी इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी साठी होस्टेल व मेस सुविधा इ.सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन  असल्याचे प्राध्यापक अतुल गुळवे यांनी यावेळी सांगितले.
close