चेअरमनपदी बाळासाहेब केसभट तर व्हा.चेअरमनपदी अंकुश केसभट यांची निवड
प्रतिनिधी : प्रविण देशमुख
शेवगाव : १० / शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव सोसायटीची निवडणूक सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटानी एकत्र येत स्व. हिंगे मामानी घालून दिलेल्या बिनवीरोध परंपरेनुसार बिनविरोध केल्यानंतर दि 8 मार्च रोजी बाळासाहेब कचरू केसभट यांची चेअरमनपदी तर अंकुश विठ्ठल केसभट यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
"मा.आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील, मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील डॉ. क्षितिजभैया घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनेते मारुतराव घुले पाटील व स्व. सर्जेराव हिंगे मामा यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार शेतकयाचे हित जोपासने व त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन चेअरमन बाळासाहेव केसभट यांनी सत्काराप्रसंगी सांगितले,
यावेळी गायकवाड जळगावचे सरपंच आजिनाथ सुरोशे सुकळी सरपंच प्रल्हाद देशमुख सोसायटी नूतन संचालक शिवाजी दगडू केसभट, संपत केसभट, शिवाजी गायकवाड, अशोक काकडे, रमेश सुरोशे, सुभाष गायकवाड, गयाबाई केसभट, मीनाताई दिलीप झिजूर्डे, लक्ष्मण सिताराम केसभट, परमेश्वर केसभट दत्तात्रय लवंगे तसेच प्रकाश हिंगे आण्णासाहेब केसभट गणेश केसभट रमेश केसभट चंद्रकांत गवारे सुरेश केसभट प्रभाकर केसभट माजी चेअरमन छगन हुगे मंजेश सुरोशे नितीन केसभट उद्धव हिंगे अमोल केसभट भास्कर सोलाट दर्शन झरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजया पाखरे व सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव भिमराव निर्मळ यांनी काम पाहिले .

