शिर्डी- श्री बलराम जयंती व मा दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेल्या भारतीय किसान संघाचा स्थापना दिवस शिर्डी येथील हॉटेल द टेम्पल व्ह्यू येथे भारतीय किसान संघाचे  जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव  गोंदकर यांच्या  अध्यक्षतेखाली नुकताच साजरा  झाला.

यावेळी श्री बलरामजी,श्री साईबाबा,भारतमाता,छत्रपती शिवाजी महाराज व दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दिलीपराव गोंदकर तर प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा संस्थानचे मा.विश्वस्त देवराम पवार हे होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष प्राचार्य अ.नि.चौधरी यांनी केले तर आभार मधुभाऊ रोहम यांनी मानले.याप्रसंगी सोपान चौधरी,मोहनराव कोते,गंगाधर चौधरी,सिताराम चौधरी,दत्तात्रय चौधरी,नानासाहेब गाढवे,दत्तुभाऊ चौधरी,रावसाहेब गाढवे,कचरू चौधरी आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.