shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जुन्या आठवणींना दिला उजाळा.....!

न्याहळोद:महाशिवरात्रीला सर्वांनीच मंदिरात जावून भोले शंकरांचे दर्शन घेवून शिवरात्री साजरी केली ...


दिलीप भाऊ उपाध्ये यांनी रात्री 8.30/ 9 वाजता न्याहऴोद येथे आपल्या कुटुंबासह पंचमुखी महादेवाचे मनोभावे  दर्शन घेतले... दर्शन घेतल्यावर  दिलीप भाऊ मंदिराच्या समोरील पटांगणात असलेल्या बाकावर आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करत असतांना...... तिथे एक महिला  दिलीप भाऊंना भेटायला आल्या व आपली ओळख दिली की ... त्या महिला म्हणजे  श्री. हिरामण पोपट बोरसे(शिंपी) यांची कन्या तसेच नूतन माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक खैरनारसरांची भाची मंगला ताई (आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणारे) होय...... त्या त्यांच्या पती सोबत दर्शनासाठी आलेल्या होत्या..........त्यांनी आपली ओळख सांगितली व मी आपल्याला व्यक्तिशः कधी भेटली नाही.....धुळ्याला आपल्या घरी येवून आपल्या आईशी भेट झाली होती..... परंतु माझे वडील आपल्या संपर्कात होते आमची त्या वेळेस आर्थिक परिस्थिती देखील चांगली नव्हती.........मला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी...... 1986/87 साली म्हणजे 35/36 वर्षा पूर्वी कशी मदत केली हे त्या सांगू लागल्या......दिलीप भाऊनां आश्चर्याचा धक्काच बसला........ .. जुन्या नूतन हायस्कूलच्या बाजूला एक छोटसं  घरवजा दुकान आर्थिक परिस्थिती गरीबीची असलेली मंगला ताई 35 वर्षा नंतर येवून भेटून आपली ओळख देतात..... आभार मानतात..... ... आपल्यामुळे आज मी सुखी जीवन जगतेय....यातच मंगला ताईचा मोठेपणा सामावलेला आहे .......अशा लोकांच्या  आशीर्वादांमुळेच उपाध्ये कुटुंबातील सदस्याचा  व उपाध्ये मित्रपरिवाराचा उत्साह द्विगुणित होत असतो. ..................
close