shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोपाळ हिंगणे हा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेला परतू सध्याच्या युक्रेन-रशिया युद्ध सुरू असल्याने मायदेशी..!

पुर्णा :-भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारा मोठा खर्च व त्यासोबतच प्रवेश सगळ्या साठी असलेल्या अटींमुळे परदेशामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी शहरातील आनंद नगर परिसरात राहणारा गोपाळ हिंगणे हा युक्रेनमध्ये गेला. परंतु सध्याच्या युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळे त्याला जीव मुठीत घेऊन देश गाठावा लागला अशी माहिती त्यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना दिली.

शहरातील आनंद शिवदर्शन हिंगणे हा विद्यार्थी पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेला होता सलग पाच वर्षे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अचानक फेब्रुवारी महिन्यामध्ये रशिया व युक्रेनमध्ये युद्धाचा थरार सुरू झाला. दरम्यान, 15 फेब्रुवारी रोजी युक्रेन येथील ओडीसा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी च्या सर्व विद्यार्थ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले.16 फेब्रुवारीला विमानतळावर गेल्या नंतर दुपारी दोन वाजता विमानामध्ये प्रवेश केला त्याच वेळी विमानामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली चारही बाजूने विमानतळाला सैनिकांनी घेरले कधी बॉम्बस्फोट होईल कधी काय होईल याची भीती निर्माण झाली परंतु चार वाजता सर्वांना विमान बाहेर काढण्यात आले सुरक्षेची खात्री करून त्यानंतर पुन्हा विमानामध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर युक्रेन ते तुर्की ते दुबई आणि दुबई ते मुंबई याप्रमाणे प्रवास करत 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मायदेशी मुंबई येथे विमान पोहोचले. आपण सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर पोचल्याची खात्री झाल्यानंतर पवित्र मायभूमीचे दर्शन घेऊन सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा मुंबई ते पूर्ण असा दहा ते बारा तासांचा प्रवास करून 19 फेब्रुवारी रोजी सकाळी गोपाळ हे पूर्णा शहरात आपल्या घरी आले तोपर्यंत युक्रेन-रशियाचा मोठा भडका उडाला होता.

 युक्रेनमधील वातावरण करून सोडणारे होते उत्तर महाराष्ट्रासह देशातील अनेक विद्यार्थ्यांना यूक्रेन सोडताना येणाऱ्या अडचणी हे डोळ्यासमोर कायम उभे राहत होत्या परंतु देश अभिमान आणि देशाची मायभूमीची हाक यांनी आपल्याला पूर्णा शहरापर्यंत सुरक्षित आणले असल्याची प्रकट भावना गोपाळ हिंगणे यांनी व्यक्त केली.
close