विविध उपक्रम व स्पर्धातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत - प्रवीण डोंगरे.
इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रमातंर्गत विविध बीटस्तरीय स्पर्धा शाळा निमगाव- केतकी येथे संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: दि ७ रोजी इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रमातंर्गत विविध बीटस्तरीय स्पर्धा शाळा निमगाव के येथे संपन्न झाल्या.प्रथम सरपंच प्रवीण डोंगरे,पत्रकार जावेद मुलानी, मनोहर मिसाळ,बापूसाहेब घाडगे,माणिक ननवरे,शाळा व्य समिती अध्यक्षा अपर्णा मिसाळ,विस्तार अधिकारी सुनील मुगळे,केंद्रप्रमुख संभाजी आजबे,केंद्रप्रमुख मारुती सुपुते व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर आजबे साहेबांनी प्रास्ताविक करून स्पर्धांना सुरुवात झाली.त्यामध्ये बीट स्तरावर पात्र ठरलेल्या सर्व शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता.स्पर्धांचा गटनिहाय व प्रकारानुसार निकाल(प्रथम क्रमांक) पुढीलप्रमाणे... *कविता गायन(1 ली /२ री)*
१)जि प शाळा पाटीलवस्ती,केंद्र-व्याहाळी
*कविता गायन(३ री/४थी)*
१)जि प शाळा कौठळी(केंद्र-व्याहाळी)
*कविता गायन(५ वी/ ६ वी)*
१)जि प शाळा व्याहाळी
*कविता गायन(७ वी / ८ वी)*
१)जि प शाळा व्याहाळी
*गोष्ट सांगणे(३ री/४ थी)*
*गोष्ट सांगणे(५ वी/ ६ वी)*
१)अजिंक्य उमेश सुपुते-शाळा-कडबनवाडी(केंद्रशेळगाव
*शब्दसंपत्ती(३री/४थी)*
१)स्वराली सोमनाथ काशीद-जि प शाळा गोतोंडी(केंद्र-शेळगाव)
*शब्दसंपत्ती(५वी/६वी)*
१)शिवतेज सोमनाथ तनपुरे(व्याहाळी)
*शब्दसंपत्ती(७वी/८वी)*
१)आर्यन अनिल माने(व्याहाळी)
*प्रश्नोत्तरे(WH Q)(३री/४थी)*
१)स्वराली सोमनाथ काशीद-जि प शाळा गोतोंडी(केंद्र-शेळगाव)
*प्रश्नोत्तरे(५वी/६वी)*
१)वेदांत सचिन गुधाटे(व्याहाळी)
*निबंध लेखन(५वी/६वी)*
१)प्रेरणा सुभाष पवार(व्याहाळी)
*निबंध लेखन(७वी/८वी)*
१)तेजस रोहिदास तनपुरे (व्याहाळी)
*भाषण/वक्तृत्व(५ वी/६ वी)*
१)पूर्वा उमेश बरीदे(व्याहाळी)
*नाटक(Drama ५वी/६वी)*
१)जि प शाळा व्याहाळी
*नाटक(७वी/८वी)*
१)जि प शाळा व्याहाळी
सदर स्पर्धा हसतखेळत पार पडल्या.परीक्षक म्हणून माध्यमिक शाळेचे विजयकुमार फलफले,काशीनाथ सातपुते,कदम मॅडम,सरगर मॅडम यांनी काम पाहिले.त्यांना सर्व शिक्षकांनी मदत केली.यशस्वी मुलांचे कौतूक करण्यात आले.सदर स्पर्धेसाठी सरपंच प्रवीण डोंगरे,मनोहर मिसाळ,पत्रकार जावेद मुलानी,बापूसाहेब घाडगे,माणिक ननवरे,शाळा व्य समिती अध्यक्षा अपर्णा मिसाळ, यांच्या सह शिक्षक वृंद,विद्यार्थी उपस्थित होते. नियोजन व बैठक व्यवस्था निमगाव शाळेच्या वतीने करण्यात आली. बीट स्तरावरील प्रथम क्रमांक तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले.सूत्रसंचालन उमेश सुपुते यांनी केले तर आभार अंबादास हेडे सरांनी मानले.

