घरी बसलेला कार्यकर्ता तोही माझ्यासाठी महत्त्वाचा - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी:उद्याचे तुम्ही महत्त्वाचे घटक आहात. राजकारणात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल मोठे व्हायचे असेल, तर आयुष्यात एक लक्षात ठेवा पुढच्या माणसाला मान द्यायला शिका. त्यावेळी तुम्ही खूप मोठे व्हाल. मला माहित आहे प्रत्येक गावातला नेता पक्षासाठी प्रामाणिक आहे. पक्षासाठी कोण झिजतो याकडे पूर्ण लक्ष आहे .माझ्या जवळ असलेला, बसलेला व ऑफिसमध्ये आलेला कार्यकर्ता आणि घरी बसलेला कार्यकर्ता तोही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. असे रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी बाभूळगाव, अवसरी, शिरसोडी, सरडेवाडी, गलांडवाडी नं. २, वडापुरी, शहा येथील ४९ कोटी १५ लाख रुपयांची विविध विकास कामांचे समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शहा गावातील महादेवनगर येथे भव्य मिरवणूक व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सभेमध्ये स्टेज वरील युवा कार्यकर्त्यांना उद्देशून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले मत व्यक्त केले.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर ,राजेंद्र तांबिले , बाळासाहेब करगळ,हनुमंत बंडगर,प्रताप पाटील ,हनुमंत कोकाटे, अभिजीत तांबिले, अतुल झगडे, शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, छायाताई पडसळकर, नवनाथ रुपनवर, सतीश पांढरे , सचिन खामगळ तसेच राष्ट्रवादीचे इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, तालुक्यात मध्ये आपण इतका विकास निधी आणला. विकास करीत असताना काम करीत असताना एखादा रस्ता खराब झाला तर तो रस्ता त्या ठेकेदाराकडून कसा चांगला होईल यासाठी ग्रामस्थ म्हणून आपलीच जबाबदारी आहे. रस्त्यासाठी लागणारी सामग्री व्यवस्थित वापरतात का ?व्यवस्थित काम होत नसेल तर ठेकेदाराला पण रोखले पाहिजे. निश्चित प्रकारे आपण विकास काम कसं चांगलं करता येईल ते चांगल्या प्रकारे केलं पाहिजे.
शहा गावातील तसेच सतीश पांढरे व ग्रामस्थांनी अतिशय छान कार्यक्रम आयोजित करून उत्तम प्रकारे नियोजन केले. आमची भव्य अशी मिरवणूक काढली. हे प्रेम पाहून मी आज भाऊक झालो.
संधी मिळाल्यानंतर कामाच्या माध्यमातून प्रेम दाखवायचे असते तालुक्यामध्ये विकासाचे, पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याचे आपल्या तालुक्यातील चित्र बदलायचे आहे. दोन वर्षात थोडे काम कमी जास्त झाले. येणाऱ्या तीन वर्षात आपल्या तालुक्यासाठी माझ्या इंदापूर शहरासाठी जे काही चांगलं करता येईल ते करणार आहोत. कोणावर टीका टिप्पणी न करता कोणाचे मन न दुखवता चांगल्या एक प्रकारचं तालुक्यात आपल्या सगळ्याला चित्र बनवायचे आहे .
माझ्या कामाची पद्धत सांगतो, माझ्या दृष्टीने गावातील सगळे सारखी आहेत. कोण जवळचा, लामचा, कुठल्या गटातटाचा, पक्षाचा ,जातीचा पातीचा विचार न करता सगळ्यांना कसं बरोबर एकत्र करता येईल हा माझा स्वभाव आहे.
विजेच्या प्रश्नाबाबत भरणे म्हणाले की, कोरोनामुळे माझा शेतकरी दोन वर्षांपासून अडचणीत असल्याने खिशामध्ये कसल्याही प्रकारचे पैसे नसल्यामुळे त्यांची अडचण आहे. हे पण बरोबर आहे आपण सगळे शेतकरी आहोत. शेतकऱ्याची व्यथा दुःख अडचणी आपल्या बाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहित आहेत. काल-परवा राज्याचे माजी ऊर्जामंत्री व आत्ताचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व मी विजेच्या प्रश्न लावून धरला. त्यावेळी नितीन राऊत यांना सांगितले की, शेतकरी पैसे कधी बुडवणार नाही. त्यांना थोडे हप्ते पाडून द्या. शेतकऱ्यांसाठी मागं-पुढं करा .कदाचित या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक आहे .त्या बैठकीमध्ये निश्चित प्रकारे काहीतरी एक सकारात्मक मार्ग निघेल अशा प्रकारची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशा आहे .ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी निश्चित प्रकारे भरले पाहिजेत. एम एस ई बी. . ला इतर खर्च कोळसा खरेदीसाठी पैसे लागतात .एम एस ई बी अडचणीत आहे. सरकारच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमच्यासारखे कार्यकर्ते निश्चित प्रकारे करणार आहेत.
आज ४९ कोटी १५ लाख रुपये याचे उद्घाटन झाले. ४९ कोटी १५ लाख रुपये आणण्याचे काम येड्या गबाळ्याचे आहे का ?यासाठी खूप कष्ट लागते. एवढे सोपे नसते. देशाचे नेते शरद पवार , उपमुख्यमंत्रीअजित पवार , खा.सुप्रियाताई सुळे यांच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने हे शक्य झाले आहे .सगळे रस्ते सगळ्या रस्त्याला जोडले पाहिजेत .विरोधकांवर टीकाटिपणी करून मोठं करू नका. तुमचा आशीर्वाद सहकार्य माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मिळणे हे भाग्यच. आपली मिरवणूक चांगली काढली म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे .
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की,तरूणांनो काम करताना गोरगरीब माणसाला मदत करा. अल्पसंख्यांक, मागासवर्गीय लोकांच्या मागण्या खूप मोठ्या नसतात .खूप छोटी कामे असतात. त्यांना मदत करा. गोरगरीब माणसाला मदत सहकार्य केले की, ती माणसं कधी आपल्याला विसरत नाहीत.
आज सांगतो की. तालुक्यामध्ये मला राजकारणात विचारलं जातं मामा एवढी मोठी यंत्रणा असताना तुम्ही निवडून येण्याचे रहस्य काय? मी त्यांना सांगतो माझं निवडून येण्याचं रहस्य या तालुक्यातील गोरगरीब जनता, मागासवर्गीय माणसं ही माझं रहस्य आहे. गरीब माणूस ही माझी ताकत आहे. जोपर्यंत गरीब माणूस आपल्याबरोबर आहे तोपर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये भिण्याचे काही कारण नाही. तालुक्यातील विकासाचं माझ्यावरती सोडा .यावेळी प्रदीप गारटकर यांना उद्देशून सार्वजनिक बांधकाम विभागातून साडेअकराशे कोटी रुपये आले आहेत.आत्ता मला लढायचे ते शेतीच्या पाण्यासाठी लढायचे आहे. आता पाण्याचा पेपर फोडणार नाही अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

