shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छायाताई पडसळकर यांचा सामाजिक,राजकीय प्रवास.जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख.

छायाताई पडसळकर यांचा सामाजिक,राजकीय प्रवास.

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी: छायाताई पडसळकर या काटी गावातील असून त्यांनी २००७ साली पंचायत समितीची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली. महिला कार्यकारणी संघटनेत २००८ साली . राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली .तसेच ओबीसी महिला अध्यक्षा म्हणून इंदापूर तालुक्यात काम करण्याची संधी ही त्यांना मिळाली. त्यामुळे त्या सामाजिक कार्य करत असताना कुठल्यातरी माध्यमाची गरज असते .ते माध्यम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होय.
  या पक्षाच्या माध्यमातून त्या सर्व अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत बचत गटाची स्थापना केली. महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण वाढविण्यासाठी महिलांना सक्षम  बनवण्यासाठी स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी प्रयत्न करण्यात केले. महिलांना आरोग्याविषयी जनजागृती करून त्यांच्या आरोग्याचे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली. अशा कामाची पडताळणी करून त्यांना वेगवेगळे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सावता परिषद अरण या संस्थेकडून सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार २०१७ साली मिळाला.या नंतर २०१८ साली खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष पद मिळाले. त्यानंतर सामाजिक जीवन गौरव पुरस्कार २०१९साली राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने यांच्या हस्ते मिळाला. २०२१ साली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पदावरती फेरनिवड करण्यात आली. या सर्व कालावधीमध्ये मी त्यांनी जीवनातील अनमोल क्षण हा समाजकार्यासाठी दिलेला आहे. त्याचीही त्यांनी मिळालेल्या संधी सर्व समाजासाठी अर्पण करत   असल्याचे महिला दिनानिमित्त त्यांच्या या कार्याची माहिती त्यांनी दिली.
close