खासदार शरद पवार यांच्या सभेला निर- निमगावातुन  उस्फूर्तपणे ४१ गाड्यांचा ताफा.

निर- निमगावातुन दत्तात्रेय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली ४१ गाड्यांचा ताफा शरद पवार यांच्या सभा ऐकण्यासाठी शेतकरी मेळाव्यास दाखल.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निर निमगाव येथील ४१ गाड्यांच्या तापा अनेक कार्यकर्त्यांसह लाखेवाडी येथील जय भवानीगड विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर तालुका आयोजित भव्य शेतकरी मेळावा व अनेकांचे पक्ष प्रवेश शरद पवार यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रियाताई सुळे ,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व इतर अनेक मान्यवर यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवण्यासाठी दिनांक ३ एप्रिल रोजी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे इंदापूर तालुक्यात लाखेवाडी येथे येणार असून ते भव्य शेतकरी मेळावा याद्वारे अनेक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांना संबोधित करणार असल्याकारणाने निर निमगाव येथील अनेक तरुणांनी स्वतःच्या गाड्या घेऊन सजवून त्यांना झेंडे लावून ४१ गाड्यांचा ताफा यासह लाखेवाडी येथील कार्यक्रमास उस्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली अशी माहिती युवा नेतृत्व रंजीत घोगरे यांनी दिली.
यामध्ये निर निमगाव चे माजी सरपंच देवराज जाधव, शशिकांत चांगण, भीमराव गरगडे, प्रताप देवडे ,संजय जाधव, मोहन जाधव ,ज्ञानदेव जाधव ,सचिन पवार ,रामदास गरगडे, उद्धव गरगडे, गोरख देवडे, बाळासो गरगडे ,संतोष सावळकर ,लाला जाधव ,सनी जाधव, सुनील निकम, ज्योतीराम घोडके, महेंद्र जाधव ,बबर चांगण, तानाजी काळे ,संतोष वनवे, नामदेव घोगरे, दीपक जाधव व इतर कार्यकर्ते होते.