संगमनेर: - गुडीपाडव्याच्या रम्य सायंकाळी संगमनेर साहित्य परिषद आयोजित "वसंतोत्सव" हा मराठी भावगीत, भक्तिसंगीत आणि मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम कालिका माता मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात झाला. स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली..
या कार्यक्रमात प्रतिभा देशपांडे यांनी "बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला" विकास खेडकर यांनी "देह देवाचे मंदिर",आणि सांगा मुकुंद कुणी हा पहिला", अनघा खेडकर यांनी "मी मनात हसता" आणि "राधा गवळण,करिते मंथन" , दर्शन जोशी यांनी " दिवस तुझे फुलायचे" आणि " कानडा राजा पंढरीचा" , दीपक क्षत्रिय यांनी "शोधिसी मानवा" आणि फिरत्या चाकावरती" , मंगला पाराशर यांनी "बाई मी विकत घेतला शाम" आणि "रामा रघुनंदना", विजय दीक्षित यांनी "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल" आणि "भरे मनात सुंदरा" ,शोभा काळे यांनी "रंगात रंगले" यांनी गाणी म्हणत रसिकांची मने जिंकली . संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष लक्ष्मण ढोले यांनी केले. या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता गुणे आणि अनिल सोमणी यांनी केले.
या कार्यक्रमास संगमनेर साहित्य परिषदेचे दिलीप उदमले ,विकास भालेराव , मनोज साकी, गिरीश सोमाणी, ज्ञानेश्वर राक्षे, शोभा बाप्ते , पुष्पाताई निऱ्हाळी , हिरालाल पगडाल, सुरेंद्र गुजराथी, संजय नेने, तनुष पठाडे , रघुनाथ वाघ , ललित देसाई , महेश गोडसे , राजेंद्र वेल्हाळ, लहानू सदगीर, प्रकाश शिंदे, कारभारी देव्हारे, डॉ. सुधाकर पेटकर आणि संगमनेर मधील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्तित होते. आभार मनोज साकी यांनी मानले

