श्रीरामपूर (शौकतभाई शेख):- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने संचालक मंडळ विविध उपाययोजना राबवत आहे. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा कांदा गोणी विरहीत बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवार दि.२४ एप्रिल रोजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते मोकळा कांदा मार्केटचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सभापती सौ.संगीता शिंदे यांनी दिली आहे.


श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गोणी कांद्याची आवक होत असते मात्र यामध्ये शेतकऱ्यांना गोणीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता त्यामुळे शेतकरी हिताच्या दृष्टीने श्रीरामपूर बाजार समिती संचालक मंडळाने मोकळा कांदा विक्री करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांचा गोणीसाठी होणारा खर्च आता वाचणार आहे या मोकळा कांदा विक्रीचा शुभारंभ अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते आणि माजी सभापती नानासाहेब पवार,माजी सभापती दिपकराव पटारे,बाजार समिती सभापती संगीताताई शिंदे,मा.जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, संगीताताई गांगुर्डे,पंचायत समिती मा.उपसभापती बाळासाहेब तोरणे,पंचायत समिती माजी सदस्य वैशालीताई मोरे, कल्याणीताई कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता श्रीरामपूर बाजार समितीच्या मुख्य आवारात संपन्न होणार असून यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला मोकळा कांदा बाजार समितीमध्ये विक्री साठी आणावा असे आवाहन श्रीरामपूर बाजार समितीच्या सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे,सचिव किशोर काळे,माजी सभापती नानासाहेब पवार,माजी सभापती दीपक पटारे,संचालक विश्वनाथ मुठे,सचिन गुजर,डॉ नितीन आसने,सोन्याबापु शिंदे,सुधीर नवले,कैलास बोर्डे,राधाकृष्ण आहेर,मुक्ताजी फटांगरे,नंदाताई शेलार,विद्यालय दाभाडे,राजेंद्र तोरणे,भाऊसाहेब थेटे,जितेंद्र गदिया दीपक हिवराळे, डॉ.रामलाल काळे,भाऊसाहेब कांदळकर यांनी केले आहे.

नाशिक लासलगांव मार्केटच्या धर्तीवर श्रीरामपूरमध्ये प्रथमच मोकळा कांदा लिलावास सुरुवात होत असून शेतकऱ्यांनी मोकळा कांदा वाहनांमध्ये प्रतवारी करूनच आणावा तसेच लिलाव झाल्यानंतर मालाची तक्रार असेल तर संबंधित कांदा कमिटी निर्णय घेईल.मोकळा कांदा लिलावामुळे शेतकऱ्यांचे गोणी,मजुरी व वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी मोकळा कांदा मार्केटचा फायदा द्यावा असे आवाहनही बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मंगळवार व गुरुवार या दिवशी मोकळा कांदा लिलाव सकाळी १० आणि दुपारी ४ वाजता होणार असून शेतकऱ्यांनी लिलावाच्या अगोदर दहा मिनिटे उपस्थित रहावे.