भोसरी, येथील नारायण शिक्षण संस्थेच्या शाळा परिसरात जागतिक "वसुंधरा दिनानिमित्त" प्लास्टिक व घनकचरा निर्मूलन आणि वृक्षारोपण संपन्न-शाळेत ऍडमिशन घेतलेल्या मुलांच्या महिला पालकांच्या (महिलांचा सन्मान) हस्ते वृक्षारोपण
करण्यात आले.
भोसरी । प्रतिनिधी :- शुक्रवार दिनांक २२/४/२०२२ रोजी सायंकाळी सहा ते सात (६:०० ते ७:००)या वेळेत नारायण हट शिक्षण संस्थेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून वसुंधरेचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून छोटासा हातभार लागावा व लोकांपर्यंत वसुंधरा संवर्धनाचा संदेश जावा.
यासाठी वृक्षारोपण, घनकचरा व प्लॅस्टिक निर्मूलन कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये लहान मुले, महिला, पालक, विद्यार्थी व संस्थेचे सभासद, संचालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नारायण हट शिक्षण संस्थेची पूर्व प्राथमिक शाळा सन 2022- 23 या वर्षातसुरू होत असून इंग्रजी व सेमी इंग्रजीमाध्यमाचे वर्ग सुरू होत आहेत. या नव्याने सुरू होणार या शाळेत नुकतेच ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या महिला पालकांच्या हस्तेआज वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये मालतीताई रोडे, अलकाताई भुते, रेश्मा साखरे, यांचा समावेश आहे.प्रातिनिधिक स्वरूपात काही फुलांची झाडे व वटवृक्ष, कडूनिंब, पिंपळ, तुळस, व इतर झाडे लावण्यात आली.
शाळेतील मुलांच्या महिला पालकांना (महिलांचा राखला सनमान) जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपणाचा सन्मान देऊन शाळेने ही वेगळी परंपरा जपली आहे. याशिवाय शाळा परिसरातील कचरा, प्लास्टिक गोळा करून त्याचे निर्मूलन करण्यात आले.
प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी याप्रसंगी उपस्थितांना वसुंधरेच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. व वसुंधरेचे संरक्षण करण्याचीप्रतिज्ञा घेतली.या कार्यक्रमात मालतीताई रोडे, अलकाताई भुते, रेश्मा साखरे, नील मिडगुले, आरव बंडकर, श्लोक साखरे, आयुष साखरे, गिरीजा आवटी, सौ. उज्वला थिटे, मा. श्री. संजय सांगळे, मा. श्री. अंकुशराव गोरडे, डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न व मोलाचे योगदान दिले.

