सांगली : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ विद्या हक्के, सांगली जिल्हा अध्यक्ष संग्राम पाटणकर व सांगली जिल्हा प्रवक्ता सुधीर देवकुळे यांच्या वतीने माननीय डॉक्टर ताटे तसेच आरोग्य अधिकारी माननीय अंबोले साहेब यांना निवेदन दिले.
या निवेदनात अशी मागणी करण्यात आली डॉग व्हॅन या पथकासाठी कायमचा मुकादम नेमण्यात यावा व भटक्या कुत्र्या साठी महापालिकेकडून सक्षम यंत्रणा राबवावी. तसेच या भटक्या कुत्र्या मुळे एका लहान मुलीचा चावा घेण्यात आलेला.त्यामुळे मुलगी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे अशा वारंवार घटना सांगली शहरात घडत आहे .
याला कारणीभूत डॉग व्हॅन कर्मचारी पथक आहे यांनी बराच घोटाळा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे पण अद्याप ते आरोपी पकडण्यात आलेले नाही.त्यांना लवकर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी.
तसेच या मुलीचा खर्च या कर्मचाऱ्याकडून वसूल करण्यात यावा. म्हणून संघटनेच्यावतीने इशारा देण्यात येत आहे की ताबडतोब कायमचा मुकदम नेमून व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा राबवावी.अन्यथा संघटनेच्यावतीने महापालिकेमध्ये कुत्रे सोडून आंदोलन करण्यात येईल.
यावेळी प्रमुख उपस्थिती सांगली जिल्हा प्रवक्ता सुधीर देवकुळे, सांगली जिल्हा प्रभारी समाधान मोहिते, सांगली जिल्हा मीडिया अध्यक्ष सुनील साबळे ,आदी प्रवर्ग उपस्थित होते.

