गोरगरिबांना सर्वाधिक मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना ,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना मधील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: अपंग, विधवा, परितक्त्या ,निराधार व वंचित घटकातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हे सर्वांचे कर्तव्य असून सेवा करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करून गोरगरिबांना सर्वाधिक मदत करणे हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना मधील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप तसेच निराधार महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम शहा संस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांची इंदापूर तालुका योजनांच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे ,अतुल झगडे, छायाताई पडसळकर ,सागर मिसाळ, बाळासाहेब ढवळे, श्रीधर बाब्रस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व महसूल विभागातील अधिकारी तसेच योजनेतील सदस्य हनुमंत कांबळे, रहेना मुलानी, लक्ष्मण परांडे ,महादेव लोंढे, नितीन शिंदे, दत्तात्रय बाबर ,अजय भिसे, प्रमोद भरणे, बाबासो निंबाळकर व लाभार्थी उपस्थित होते.

