shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर नगरपालिकेला १५ कोटी रुपयांचा निधी - माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांची माहिती.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर नगरपालिकेला १५ कोटी रुपयांचा निधी  - माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांची माहिती.


इंदापूर नगरपालिकेची आढावा बैठक संपन्न.

इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर नगरपालिकेची आढावा बैठक दिनांक ६ मे २०२२ रोजी नगरपालिकेच्या सभागृहात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आजी माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

 यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठकीदरम्यान इंदापूर नगरपालिकेला १५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस  यांनी दिली. 
ते पुढे म्हणाले की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर शहराचा विकासाचा कायापालट होणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे.
close