पिठेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ.
२९ वर्षाची परंपरा असलेल्या पिठेवाडी गावचा अखंड हरिनाम सप्ताह हा अध्यात्मिक, सामाजिक आणि गावाचा एकोपा जपणारा सोहळा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील नीरा नदी किनारी वसलेले पिठेवाडी गाव या गावांमध्ये गेली एकोणतीस वर्षापासून अध्यात्मिक, सामाजिक, संत विचार, लहान थोरा मध्ये आदरभाव ठेवत, संस्कारमय विचारांची जपणूक करणारी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात दिनांक ७ मे २०२२ रोजी करण्यात आली. या हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त ग्रामस्थ पिठेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता १४ मे २०२२ रोजी होणार आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांमध्ये अखंड वीणा, पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ, ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ भोजन, रात्री ८ ते १० हरी किर्तन होणार आहे.
तर या सप्ताहामध्ये प्रवचन सेवा हरीभक्त पारायण महाराज यांची नावे पुढील प्रमाणे:अर्जुन कोळेकर कचरेवाडी, पानसरे गुरुजी विकासवाडी ,दत्तात्रय वाघमोडे पिठेवाडी ,विठ्ठल पाटील रेडणी, रामपुरे लातूर ,काकासाहेब हुबाले पिठेवाडी,
तसेच कीर्तन सेवा ह. प. महाराज पुढील प्रमाणे: नाना पांढरे नातेपुते, नंदूकाका आरगडे लाखेवाडी, महादेव गुरव बिजवडी, बंडा डोंबाळे कळंब, नरळे जलोची, बापूसाहेब ढगे सुरवड ,ज्ञानेश्वर जळगावकर, तसेच काल्याचे किर्तन गोरख रायते पंढरपूर यांचे होणार आहे.
या सप्ताहातील नाष्टा व अन्नदान सेवा गावातील दानशूर ग्रामस्थांच्यावतीने प्रत्येक दिवशी सकाळचा अल्पोपहार देणाऱ्या अन्नदाते: प्रतीक व्हनकडे, साधू शेंबडे, तानाजी पारेकर, विठ्ठल वाघमोडे, एकनाथ शेंडगे, अगतराव वाघमोडे, तुकाराम शेंबडे, विठ्ठल पोमने,
प्रत्येक दिवशी दुपारचे जेवण :महारुद्र शेंबडे, भारत कोळेकर, संभाजी मासाळ, तुकाराम डोंबाळे, खंडेराया इंजी रिंग अँड मोटर रिवाइंडिंग वर्क्स पिठेवाडी .
प्रत्येक दिवशी सायंकाळचे जेवण: नारायण वाघमोडे, धुळदेव शेंडगे, तानाजी मदने ,रामचंद्र बुरुंगले ,महादेव डोंबाळे, शिवाजी बंडगर ,साधू जानकर या अन्नदाते यांची पंगत होणार आहे.

