shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सफाई कामगारांचे वेतन ताबडतोब करा अन्यथा ...संघटना आंदोलन छेडणार


छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीने निवेदन 

प्रतिनिधी : निरज चांगटे

नगर : ७ / मागील काही महिन्या पासून रखडलेल्या छावणी परिषद सफाई कामगार यांच्या वेतना संदर्भात आज अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शुमम टाक अहमदनगर जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे ,उपाध्यक्ष राहुल लखन ,जिल्हा सचिव प्रशांत पाटोळे, शिवराष्ट्र सेनेचे भिंगार शहराध्यक्ष कुणाल बैद ,युवा नेते अभिषेक भाई भगवाने ,आनंद बग्गन ,दिपक नकवाल यांनी भेट घेतली व निवेदन दिले. 

सध्या चालू असलेली स्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली त्या बाबत त्यांनी सकारात्मक ऊत्तर देत वरील कार्यलयास पाठपुरावा केला आहे लवकरच वेतन व पेन्शन सुरळीत होईल असे आश्वासन दिले .
नाही झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
close