shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; जीवे मारण्याचा प्रयत्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                       सोमवार दिनांक २० जून २०२२

अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; जीवे मारण्याचा प्रयत्न..!!


राहुरी : आरडगाव येथे अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराचा अमानवीय घटना घडली. नराधमाने अत्याचार केल्यावर बालिकेचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. राहुरी पोलीस ठाण्यात आज (रविवारी) अपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. किशोर ऊर्फ केश्या विजय पवार, (रा.आरडगांव, ता. राहुरी) असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. आरडगाव येथे काल (शनिवारी) दुपारी साडेबारा वाजता नराधम आरोपीने पीडित बालिकेच्या घरात आई-वडील नसल्याची संधी साधली. बालिकेला उचलून नारळाच्या झाडा जवळ खुरुद यांच्या शेताच्या बांधावर नेले.
तेथे बालिकेच्या अंगातील कपडे काढून अमानवीय अत्याचार केला. नंतर बालिकेच्या कपड्याने, तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न नराधम आरोपीने केला. एवढ्यात, बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेणारी तिची आई घटनास्थळी पोचली. आईने नराधम आरोपीला जागेवर पकडून आरडाओरडा केला. बालिकेच्या वडिलांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पाहताच नराधम आरोपीने पीडितेच्या आईला धक्का मारुन, पलायन केले. नशीब बलवत्तर म्हणून बालिकेचे प्राण वाचले. तिला उपचारासाठी नगर येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, उपनिरीक्षक एस. बी. देवरे, राहुरीचे पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, सज्जन नाऱ्हेडा यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस पथकाने काल (शनिवारी) शोध घेऊन, नराधम आरोपीला ताब्यात घेतले. आज (रविवारी) पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा करीत आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close