shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलचा केज मध्ये शुभारंभ..!!



विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार व आंतरराष्ट्रीय शिक्षण..

प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-

विद्यार्थ्यांना दर्जेदार व आंतरराष्ट्रीय शिक्षण मिळावे या उद्देशाने नव्याने केज येथे सुरू होत आसलेल्या विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलचा शुभारंभ आज होणार आसून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजयकांत मुंडे यांनी केले आहे.



आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील ९५ वर्षांपासून दर्जेदार शिक्षण देऊण सर्वदूर पोहचवून राष्ट्र बांधणीचे कार्य करण्यात पोद्दार स्कुल आघाडीवरआहे.

महाराष्ट्र,गुजरात,मध्यप्रदेश,गोवा,कर्नाटक,बिहार,पश्चिम बंगाल,आंध्रप्रदेश,छत्तीसगड,पंजाब या राज्यात पोद्दार स्कुल कार्यरत आहेत.त्याच धर्तीवर बीड जिल्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे धडे घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.पोद्दार स्कुल या CBSC दिल्ली बोर्डाशी संलग्न आहेत.यामध्ये पोद्दार नेटवर्कने विकसित केलेला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व सातत्यपूर्णरित्या आभ्यासक्रम शिकवला जातो.तसेच Batwenus नावाच्या अॅपच्या माध्यमातून शाळेत होणार्या प्रत्येक कृतीविषयी पालक माहिती मिळवू शकतात व शाळेशी संपर्कात राहू शकतात.पोद्दार लर्न स्कुलच्या माध्यमातून या भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी नव्याने सुरू झालेल्या विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलने उपलब्ध करूण दिली आहे.आज सकाळी ११ वा.स्कुलचा शुभारंभ केज - कळंब हायवे येथे होणार आसून पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजयकांत मुंडे व अतुलदादा मुंडे  यांनी केले आहे.
close