चंद्रपूर-किरण घाटे-
 डॉ .रामदयाल मुंडा  व रमणिका गुप्ता निर्मित आदिवासी साहित्यिक मंच भारत , फेडरेशन ऑफ इंडियन इंडिजिनस  लँगवेज व टाटा स्टील फाऊंडेशन या संस्थेने आदिवासी संस्कृती सेंटर सोनारी जमशेदपूर येथे द इंटरनॅशनल डेकाड आँफ इंडिजिनस लँग्वेजेस(आय डी आय एल 2022- 2032) युनेस्कोच्या जागतिक आदिवासी भाषा दशक अनुषंगाने एक दिवसीय चर्चा सत्र आयोजित केले होते. 

आदिवासी भाषा मृत होत असून त्या जिवंत राहणे आवश्यक आहे यासाठी जगभरातील आदिवासी अभ्यासक हे आदिवासी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या चर्चेत  वाहरुदादा सोनवणे जेष्ठ साहित्यिक, यांनी आपले विचार व्यक्त केले भाषा  नष्ट  होणे म्हणजे जीवनमूल्ये, संस्कृती नष्ट होणे आहे,आदिवासींची भाषा संस्कृती इतिहास, परंपरा ह्या संपूर्ण मानवीयता जपतात यामुळे याचे जतन करण्यात यावे असे ते म्हणाले. कुसुम ताई अलाम गडचिरोली, डॉ .वासवी किडो, रांची, विकास देव राय बर्मा साहित्यिक त्रिपुरा, सी आर मुर्ती,मोहन  राजेंद्र नाथ मुर्मु, झारखंड यांनी आपले मत मांडले. संथाली, कुडुख, हो, खडीया,भीलोरी, उरांव, पावरी, कोकबोराख, भुमिया व अन्य भाषेचे साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.आगामी काळात सांस्कृतिक मंत्रालय येथे या संबंधी पाठपुरावा करण्यात येणार आहे.