shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वैष्णवी महिला बचत गटकडुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! मिनाक्षि गुजरकर यांचा पुढाकार

चंद्रपूर-▪️किरण घाटे▪️
चंद्रपूरातील स्थानिक जटपूरा गेट येथील वैष्णवी महीला बचत गट कडून दहावी व बारावी परीक्षेत  गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला .
 



धनश्री बिरीया ,ऋतुजा तेलमासरे ,सुरज  चव्हाण,महीमा सदभ्भये ,स्वाती नेवलकर, पल्लवी जुमडे ,आयुष्य खोब्रागडे, क्रितीका बेले ,श्रूति शेंडे ,पल्लवी चौधरी या विद्यार्थ्यांनी झालेल्या  परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.त्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाला प्रामुख्याने वैष्णवी महिला बचत गटाच्या अध्यक्षा  मिनाक्षि गुजरकर ,सुलभा जक्कुलवार ,कविता वैरागडे,रुपाली जुमडे,उमा जुमडे,रिना त्रिवेदी,निता खोब्रागडे, व वैष्णवी महिला  बचत गटातील अन्य  महिला उपस्थित होत्या. 


सर्वांनी या गुणवंत  विद्यार्थ्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या.हा कार्यक्रम आयोजित करण्या करिता वैष्णवी महिला बचत गटाच्या अध्यक्षा मिनाक्षी गुजरकर यांनी पुढाकार घेतला होता.
close