शिक्षणाधिकाऱ्याचा शिक्षकावर वचक उरला नाही !
शाळा तपासायला आलेल्या केंद्र प्रमुखावर उगारला मुख्याद्यापकाने हातोडा! !
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
आधीच खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मेटाकुटीला आल्या आहेत त्यात भरीस भर म्हणून की काय ! त्यात एका शाळेवर भेट देण्यासाठी गेलेल्या महिला केंद्रप्रमुखावर घटक शाळेच्या मुख्याद्यापकाने चक्क लोखंडी हातोडा उगारून धमकविले असून या प्रकरणी भयभीत महिला केंद्र प्रमुखाला गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलीसात तक्रार करण्याची परवानगी दिली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २४ जून रोजी केज तालुक्यातील केंद्राच्या प्रभारी केंद्र प्रमुख डी. एन. दरबारे या सारणी (सांगवी) जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रातील सासुरा येथील जिल्हा जिल्हा शाळेला भेट देऊन शाळा तपासणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी तेथील मुख्याद्यापक धर्मराज किसन ठोंबरे यांनी महिला केंद्र प्रमुख डी. एन.दरबारे यांना अपमानजनक वागणुक दिली. त्यांच्या सोबत हूज्जत घालून दबाव आणण्यासाठी व घाबरवण्यासाठी हातात लोखंडी हातोडा घेऊन धमकावण्याचा प्रयत्न केला.
ठोंबरे हे दरबारे यांना जातीय मानसिकतेतून त्रास देत आहे. केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी पदभार घेतल्या पासून मुख्याद्यापक धर्मराज ठोंबरे हे अपमानजनक व जातीय मानसिकतेतून त्रास देत आहेत. सदर प्रकरणी केंद्रप्रमुख श्रीमती दरबारे यांनी गटशिक्षण अधिकारी सुनील केंद्रे यांना पत्र दिले असून त्यांनी या संबंधी फौजदारी कार्यवाही करण्या संदर्भात परवानगी मागितली आहे.
आपल्या अधिकाऱ्यावर जर एखादा शिक्षक असे गैरवर्तन करीत असेल तरत्याच्या पासून विद्यार्थ्यांच्या जीविताला देखील धोका संभवू शकतो !
--------------------------------------------------
अद्याप शिक्षण विभागाने कार्यवाही का केली नाही! :- केंद्रप्रमुखाच्या लेखी तक्रारी नंतर सुद्धा गटशिक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ कार्यालयाने याची आद्यपही का चौकशी केली नसावी ! याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
------------------------------------------------

