एन. ई. एस.   हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी:देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त एन. ई. एस.   हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या आजादी का अमृत महोत्सव या दिनाचे अवचित्य साधून विद्यालयांमध्ये इयत्ता ५ वी ते १२वी तील विद्यार्थ्यांचे निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील अनेक मुला मुली ंनी सहभाग घेतला.
निबंध लेखनासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, माझ्या कल्पनेतील भारत, एका स्वातंत्र्यसेनानी ची आत्मकथा, माझा आवडता समाज सुधारक किंवा नेता असे विविध विषय देण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेसाठी निसर्ग चित्र, स्मरण चित्र, काल्पनिक चित्र असे विविध विषय देण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन नंदकुमार रणवरे उपस्थित होते. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना संस्था पदाधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक, कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व सर्वांचे गोड कौतुक केले.
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक मधुकर खरात यांनी केले तर सूत्रसंचालन उपशिक्षक प्रमोद चव्हाण यांनी केले.